मालधक्क्यावर जाऊन आमदार संग्राम जगताप यांनी साधला माथाडी कामगारांशी संवाद

अहमदनगर शहरातील रेल्वे मालधक्का स्थलांतरण केले जाणार असल्याची चर्चा शहरात आहे.
मालधक्क्यावर जाऊन आमदार संग्राम जगताप यांनी साधला माथाडी कामगारांशी संवाद
sangram jagtap.jpg

अहमदनगर : अहमदनगर शहरातील रेल्वे मालधक्का स्थलांतरण केले जाणार असल्याची चर्चा शहरात आहे. त्यामुळे माथाडी कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा मालधक्का स्थलांतरीत करू नये या मागणीसाठी माथाडी कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते.

ही माहिती आमदार संग्राम जगताप यांना मिळाल्यावर आज त्यांनी स्वतः रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्यावर जाऊन माथाडी कामगारांशी संवाद साधला. यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, सुमतीलाल कोठारी तसेच माथाडी कामगार व प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा...

आमदार संग्राम जगताप म्हणाले, गेल्या आठ दिवसांपासून शहरातील रेल्वे मालधक्का दुसरीकडे हलविण्याचा चालू आलेला डाव साध्य होऊन देणार नाही, जिल्हा कृषी विकास अधिकारी यांच्या आडमुठे धोरणामुळे व चुकीच्या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल चालू आहे त्यामुळे 600 माथाडी कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. अधिकाऱ्यांनी चुकीचे काम करू नये अन्यथा त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला.

माथाडी कामगारांचे नेते तथा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी वारंवार आंदोलने केली व प्रशासनाला निवेदने दिली परंतु कृषी अधिकारी यांच्या आडमुठे धोरणामुळे वाहतूकदारांशी संगणमत करून रेल्वे मालधक्का इतरस्त स्थलांतरित करण्याचा डाव केला आहे. जर हा मालधक्का स्थलांतरित झाला तर सहाशे माथाडी नोंदणीकृत कामगारांवर उपासमारीची वेळ येईल यास जबाबदार कोण? नगर रेल्वे स्टेशन वरील मालधक्का सर्वांसाठी सोयीचा आहे.

हेही वाचा...

माथाडी कामगारांनी कोरोनाच्या परिस्थितीत आपली जबाबदारी सक्षम पणे पार पाडली त्यामुळे सर्वांना अन्नधान्य,खते व सिमेंटची उपलब्धता झाली आहे. कृषी विकास अधिकारी याच्या चुकीच्या धोरणामुळे व मनमानी कारभारामुळे एक महिन्यापासून हमाल कामगार काम करण्यास तयार असताना देखील सदरचा मालधक्का बंद आहे.सदरचा मालधक्का कृषी विकास अधिकाऱ्याला का बंद ठेवायचा आहे व कशामुळे हलवायचा आहे. 

त्याच्या कार्यालयीन कामकाजाचे  कारण स्पष्ट होत नाही तसेच हमाल कामगार व सहाय्यक कामगार आयुक्त यांना ही ते दाद देत नाही या ठिकाणी कार्यरत असलेले ट्रान्सपोर्ट कंपनीच्या व वाहतूकदार संघटनेच्या सोयीसाठी ही भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. हा मालधक्का स्थलांतरित होऊन देणार नाही तसेच सदर कामगारांचा प्रश्‍न मार्गी न लागल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या सर्वस्व जबाबदारी कृषी विकास अधिकारी व प्रशासनाची राहील असा इशारा त्यांनी यावेळी दिला व कामगार मंत्री व पालकमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला आहे
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in