गजी नृत्याला आमदार रोहित पवारांच्या ढोल वादनाची साद

राज्य सरकारकडून सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती स्थापन करण्यात आली आहे.
गजी नृत्याला आमदार रोहित पवारांच्या ढोल वादनाची साद
Rohit pawar1.jpg

अहमदनगर ः कर्जत-जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांची नुकतीच सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीच्या सदस्यपदी निवड झाली. या निमित्त कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काही कार्यकर्त्यांनी गजी नृत्य प्रकार सादर केला. हे पाहून आमदार रोहित पवार यांनी हातात ढोल घेऊन वाजवत उपस्थितांची मने जिंकली. हे नृत्य व ढोल वादनाची चर्चा आज कर्जत तालुक्यात होती. MLA Rohit Pawar's drumming call to Gaji dance

राज्य सरकारकडून सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती स्थापन करण्यात आली आहे. कर्जतमध्ये आमदार पवार यांचा धनगर समाजाच्या वतीने व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे यांच्या पुढाकारातून सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा...

आमदार रोहित पवार यांनी स्मारक उभारणीच्या समितीमध्ये आपली निवड केल्याबद्दल राज्य सरकारमधील सर्व मंत्री व प्रमुख व्यक्ती यांचे आभार मानले. समितीत चांगले काम करण्याची आश्वासन देतानाच विकासामध्ये जात-धर्म यांना थारा नाही. सर्वांना सोबत घेऊन आपण विकास करणार आहोत असे सांगितले. सांगताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

आमदार रोहित पवार यांच्या निवडीचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. यावेळी आदिवासींचे पारंपारिक वाद्य व गजी नृत्य याचे आयोजन करण्यात आले होते. नृत्यातील पद लालित्य व ढोलाचा आवाज यामुळे आमदार रोहित पवार हे स्वतःला थांबवू शकले नाहीत. तेही या नृत्य प्रकारात सहभागी झाले. आमदार पवार ढोल वाजवत असताना नृत्य करणाऱ्यांनी त्यांच्या भोवती रिंगण केले होते.

आमदार पवार यांचा वाढता लोकप्रियतेचा आलेख
आमदार रोहित पवार निवडणुकी पूर्वी व त्यानंतरही सामान्य जनमानसात मिसळत. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊ लागले आहे. आमदार पवार हेच परिसरातील विकासाचा अनुशेष भरून काढतील असा विश्वास जनसामान्यांत निर्माण झाला आहे. त्यामुळे आमदार पवार यांचा कर्जत-जामखेड मतदार संघातील लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in