rohit pawar.jpg
rohit pawar.jpg

आमदार रोहित पवारांनी पावसाच्या पाहणीसाठी चालविला ट्रॅक्टर

मुसळधार पावसामुळे आणि नदीला जामखेड तालुक्यातील काही भागात नुकसानही झालं आहे.

जामखेड : अहमदनगर जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून पावसाने थैमान घातले आहे. शेवगाव, पाथर्डी, नगर पाठोपाठ पारनेर व राहुरीलाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. नद्यांवरील पुलांची दूर वस्ता झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले. काल रात्री जामखेड तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. 

एका जलपूजन कार्यक्रमाला त्यांना जायचे होते तसेच पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असल्याची माहिती कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना समजली. त्यांनी पावसाची तमा न बाळगता पाहणी दौरा काढला. 

हेही वाचा...

तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसलाय. मुसळधार पावसामुळे आणि नदीला जामखेड तालुक्यातील काही भागात नुकसानही झालं आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे जामखेडच्या नायगाव मध्ये दाखल झाले. त्यावेळी कच्चा रस्ता आणि त्यावर चिखल व पाणी होतं. त्यामुळं स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन रोहित पवार ट्रॅक्टर चालवत अपेक्षित स्थळी पोहोचले.

मागील काही दिवसात तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसलाय. मुसळधार पावसामुळे जामखेड तालुक्यातील काही भागात नुकसानही झालं आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे जामखेडच्या नायगाव मध्ये दाखल झाले. त्यावेळी कच्चा रस्ता आणि त्यावर चिखल व पाणी होतं. त्यामुळं स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन रोहित पवार थेट एका ट्रॅक्टरवर स्वार झाले आणि स्टेअरिंग हाती घेतलं.

हेही वाचा...

जामखेडला पाणीपुरवठा होणारा भुतवडा तलावही पावसाने तुडुंब भरला आहे. या तलावावर जाऊन रोहित पवार यांनी जलपूजन केलं. जलपूजनावेळी आमदार रोहित पवार यांच्यासोबत पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे,  याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळं रोहित पवार यांच्या मतदारसंघातील पाण्याचे साठवण तलाव भरले आहे. जामखेड तालुक्यातील मोहरी आणि काझेवाडी तलावही पाण्याने पूर्ण भरला आहे. या तलावावर जात रोहित पवार यांनी जलपूजन केलं. यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार रोहित पवार यांनी ट्रॅक्टर चालविण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आमदार पवारांचे चाहते उत्साहाने हा व्हिडिओ व्हॉट्स अॅप व फेसबुकवर स्टेटस ठेवत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com