मतदार संघाच्या विकासासाठी आमदार रोहित पवारांनी घेतली केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची भेट
rohit dada pawar.jpg

मतदार संघाच्या विकासासाठी आमदार रोहित पवारांनी घेतली केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची भेट

आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेतली.

जामखेड : विधानसभेच्या निवडणुकीतील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आमदार रोहित पवार हे कर्जत-जामखेडच्या विकासासाठी निधी आणत आहेत. त्यातून नवनवीन योजना मतदार संघात राबविल्या जात आहेत. या विकासाच्या रथाला आणखी गती मिळावी तसेच मतदार संघात पायभूत सुविधांचा विकास व्हावा यासाठी यासाठी आमदार रोहित पवार यांनी काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार व अल्पसंख्यांक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन देत चर्चा केली होती.

आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेतली. तसेच आमदार पवार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामीण क्षेत्रातील तरतुदी, सूट आणि विस्तार याबाबत चर्चा यावेळी करण्यात आली. 

हेही वाचा...

यावेळी रोहित पवार यांनी सांगितले की, कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघात प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीणचे जवळपास 10 हजार लाभार्थी आहेत. यामध्ये काही लाभार्थ्यांच्या घरांचे हप्ते बाकी आहेत, काही नागरिकांची नाव ही ‘ड’- यादीमध्ये येऊनसुद्धा त्यांची नावे काही कारणांनी वगळण्यात आली आहेत. 

या समस्या केवळ कर्जत-जामखेड मतदारसंघापुरती मर्यादित नसून सर्व राज्याला या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मनरेगामध्ये राज्यात प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य योजनेच्या ५२.६ टक्के घरांची कामे अपूर्ण आहेत. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य योजनेतील घरकामासाठी घरांच्या हप्त्यानुसार टप्प्याटप्प्याने मस्टर जारी करणे आवश्यक आहे. त्यामुळे मस्टरची काही रक्कम थकीत आहे. अशा प्रलंबित घरांच्या मस्टरसाठी मुदतवाढ द्यावी.  

त्यात आवास यादीतून अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना आहेत, हे निकष शिथिल करावे, श्रेण्यांसाठी लक्ष्य वाढविणे, घराची किंमत 2 लाख रुपये पर्यंत वाढवावी, काही पात्र कुटुंबांना चुकीच्या माहिती अपलोड केल्यामुळे सिस्टममधून वगळण्यात आले आहे यासाठी माहिती संपादनाची अद्ययावत सुविधा प्रदान करावी आणि विविध तांत्रिक समस्यांमुळे अनेकजण नोंदणी करू शकले नाहीत. अशा पात्र लाभार्थ्यांसाठी नोंदणी विंडो आणखी 15 दिवसांसाठी पुन्हा उघडण्याची परवानगी देण्यात यावी आणि महाराष्ट्रातील लाखो लाभार्थ्यांचा विचार करावा ही विनंती आमदार रोहित पवार यांनी गिरीराज सिंह यांना केली.

हेही वाचा...

आमदार रोहित पवार यांनी मूलभूत लोकसंख्या निकषात पात्र असलेली जामखेड तालुक्यातील खर्डा आणि नानस -जवला, आणि कर्जतमधील राशीन आणि कुलधरण एसपीएमआरएमच्या नेतृत्वाखाली विकसित करण्याची मागणी निवेदनाद्वारे गिरीराज सिंग यांना केली. कर्जत- जामखेड मतदारसंघातील हे क्लस्टर श्यामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुर्बन मिशन अंतर्गत अधिक चांगल्या गावांमध्ये विकसित होऊ शकतील आणि यामुळे सामुदायिक विकासाचे महत्त्व अधोरेखित होऊ शकेल असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

कर्जत- जामखेडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामीण क्षेत्रातील तरतुदी, सूट आणि विस्तार याबाबत आणि एसपीएमआरएमच्या अंतर्गत क्लस्टरला मंजुरी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी गिरीराज सिंह यांनी दिल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

आणखी तीन मंत्र्यांची घेतली भेट
आमदार रोहित पवार दिल्लीमध्ये असता केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांची भेट घेऊन मतदारसंघातील विषयांवर चर्चा केली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना भेटून मतदारसंघातील बँकांच्या अडचणी आणि शाखांची संख्या वाढविण्याबाबत चर्चा केली. तसेच खर्ड्याच्या ऐतिहासिक लढाईत अनेक शूरवीर सरदारांनी, योध्यांनी अतुल्य पराक्रम गाजवला. यामध्ये श्रीमंत तुकोजीराजे शिंदे यांचे नातू राजे दौलतराव शिंदे यांचाही समावेश होता. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी निजामाच्या फौजांना सळो की पळो करून सोडले होते. इतिहासाचा हा धागा पकडत आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचीही भेट घेऊन चर्चा केली. खर्डा किल्ल्यात उभारण्यात येणाऱ्या 'स्वराज्य ध्वज' कार्यक्रमात येण्याचे निमंत्रणही आमदार पवार यांनी त्यांना दिले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in