आमदार लहामटे साहेब स्टंटबाजी बंद करा - दीपक वैद्य

आमदार किरण लहामटे यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते दीपक वैद्य यांना जोरदार टीका केली आहे.
akole.jpg
akole.jpg

अकोले : अकोले येथे निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी काढण्यात आलेल्या भव्य मोर्चा नुकताच काढण्यात आला होता. यात आमदार डॉ. किरण लहामटे, कॉ. डॉ. अजित नवले, कॉ कारभारी उगले, शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ, आप्पा आवारी, परबत नाईकवाडी, सुरेश भिसे, महेश नवले, बाळासाहेब भोर, विनय सावंत आदी सहभागी झाले होते.

त्यामुळे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते दीपक वैद्य यांना जोरदार टीका केली आहे. दीपक वैद्य म्हणाले, सत्तेतील आमदाराला आंदोलन करावे लागते हे आमदार लहामटे यांचे अपयशच आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी बैठका मग कोणत्या प्रश्नावर होतात. फक्त स्टंटबाजी करत अकोले तालुक्यातील जनतेची आमदार दिशाभुल करत आहेत. तीन वेळा निविदा काढुन ठेकेदार न मिळण्याचे रहस्य काय? ते जनतेसमोर येऊ द्या.

हेही वाचा...

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना अकोले तालुक्याच्या जनतेला पाण्यासाठी आंदोलन करायला लागते ही अकोले तालुक्याच्या आमदार डॉ. किरण लहामटे यांचे अपयशच आहे. कोरोनाच्या संकटामुळे मजुरांची कमतरता व इतर तांत्रिक अडचणींमुळे रखडलेले कामे पाठपुरावा करून पूर्ण करणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. वरिष्ठ अधिकारी यांच्यावर अंकुश ठेवून व मंत्री महोदयासोबत बैठक लावून कामांना गती द्यायला हवी. म्हाळादेवीच्या जलसेतूचे साधारण आंतर 900 मीटर आहे. सावंतवाडी बाजूचा काही क्षेत्राचं संपादित क्षेत्र करण्यासाठी आडी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या काही दिवसापूर्वी पूर्ण झाल्या असून म्हाळादेवी जलसेतूचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. 

जलसेतुच्या 42 कॉलम पैकी 40 कॉलम पूर्ण झाले आहेत, एकूण स्लॅप 43 पैकी 22 पूर्ण झाले असुन उजव्या कालव्याच्या जलसेतू कामांमध्ये संगमनेर तालुका व अकोले तालुक्याच्या 22 गावांना पाणी जाण्यर्या पाईपलाईनला 1 कॉलमचा अडथळा होतो याबाबत जलसंपदा विभागाने जिवन प्राधिकरण विभागास जवळपास 40 लाख रूपये भरले आहे. तीन वेळा निविदा काढूनही ठेकेदार मिळत नाही याचा अर्थ काय होतो आमदार साहेब जनतेला वेड्यात काढू नका.  

हेही वाचा...

तालुक्यातल्या जनतेला माहीत आहे. काल तुम्ही संगमनेरची पाईपलाईन फोडण्याची भाषा केली पण अकोलेची पण पाईपलाईन त्या ठिकाणी आहे. ही भाषा संयुक्तिक नाही. आमदार साहेब नेहमीच स्टंटबाजी करण्यात व्यस्त राहतात. आमदार साहेब आतातरी स्टंटबाजी बंद करा. तालुक्याच्या अडीअडचणीच्या काळात सर्व राजकीय पक्षांना एकत्रित घेऊन मधुकरराव पिचड यांनी अकोले तालुक्याचे प्रश्‍न नेहमीच सोडवलेले आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा अकोले तालुक्यावर नेहमीच सख्ख्या भावासारखे प्रेम केलेले आहे. हे तालुक्यातल्या जनतेला माहीत आहे, असे वैद्य यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com