gadakh.jpg
gadakh.jpg

नेवाश्यातील चार उपसा सिंचन योजनेला मंत्री गडाख देणार गती

नेवासे तालुक्यातील पानसवाडी, लोहगाव, घोडेगाव, झापवाडी या चार उपसा सिंचन योजनांना गती देण्यासाठी मंत्री गडाख यांनी काल मंत्रालयात बैठक घेतली. यात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योजनेच्या कामाला गती देण्याचे आदेश दिले आहेत.

सोनई : नेवासे तालुक्यातील प्रत्येक भाग पाणीदार व्हावा यासाठी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख प्रयत्न करत आहेत. त्या दृष्टीने त्यांनी पाऊले टाकण्यास सुरवात केली आहे.

नेवासे तालुक्यातील पानसवाडी,  लोहगाव, घोडेगाव, झापवाडी या चार उपसा सिंचन योजनांना गती देण्यासाठी मंत्री गडाख यांनी काल मंत्रालयात बैठक घेतली. यात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योजनेच्या कामाला गती देण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा...

मंत्रालयात गडाख यांच्या अध्यक्षतेखाली नेवासे मतदारसंघातील उपसा सिंचन योजनांच्या सक्षमीकरणाबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीला जलसंधारण विभागाचे अपर आयुक्त तथा मुख्य अभियंता व्ही.व्ही.नाथ, व्यवस्थापकीय संचालक कुशिरे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी राजेंद्र काळे, सचिव दि. शा. प्रसाळे, नगर जिल्हा जलसंधारण अधिकारी पी. बी. गायसमुद्रे  उपस्थित होते.

मंत्री गडाख म्हणाले, या उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षण व बंदिस्त नलिका प्रणालीच्या कामासाठी पुण्यातील खाजगी अभिकरणास कार्यादेश देण्यात आला होता. या एजन्सीने सर्वेक्षण व संकल्पन अहवाल दिला असून त्यानुसार 2395 हेक्टरपैकी दहा टक्के क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. उर्वरित नव्वद टक्के क्षेत्र सिंचनाखाली पुर्नस्थापना करण्याची आवश्यकता आहे. 

हेही वाचा...

सद्य:स्थितीत अस्तित्वातील खुल्या वितरण प्रणाली ऐवजी बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे पाणी वितरीत करावे. तसेच ठिंबक व तुषार सिंचनाद्वारे मोठ्या प्रमाणात सिंचन करावे. संकल्प, परिगणके जसे विसर्ग, पाईपची लांबी-व्यास-जाडी, पंप हाऊस, पंप संख्या, वॉल, पाईप नेटवर्क आणि वीज इत्यादी बाबी अंतिम करुन घेण्याचे निर्देशही गडाख यांनी दिले.

उपसा सिंचन योजना स्थायी स्वरुपात कार्यान्वित करण्यासाठी सौर उर्जा प्रकल्पांची निर्मिती करण्याची गरज आहे. त्याप्रमाणे या उपसा सिंचन योजनेच्या सक्षमीकरणासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्याच्या सूचना देऊन या योजनांमुळे वहनव्यय कमी होऊन पाणी वापर कार्यक्षमता वाढेल, प्रत्यक्ष सिंचीत होणाऱ्या क्षेत्रामध्ये वाढ होईल, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन शाश्वत सिंचनाची संकल्पना यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.या बैठकीच्यावेळी नेवासे तालुक्यातील रांजणगाव व सौंदाळा उपसा सिंचन योजनेच्या पुनरुज्जीवन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. 

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com