नगर जिल्ह्यातील 'एमआयडीसी'च्या प्रश्नांवर मंत्री गडाखांनी घेतला पुढाकार

अहमदनगर जिल्ह्यातील एमआयडीसी मधीलउद्योजकांच्या विविध प्रश्नांबाबत अहमदनगर शहरातीलउद्योजकांच्या शिष्टमंडळाची राज्याचे उद्योगमंत्रीसुभाष देसाईयांचीराज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी घडवून दिली.
नगर जिल्ह्यातील 'एमआयडीसी'च्या प्रश्नांवर मंत्री गडाखांनी घेतला पुढाकार
gadakh.jpg

नेवासे : अहमदनगर जिल्ह्यात सुपे, नगर, श्रीरामपूर आदी ठिकाणी एमआयडीसी आहेत. तेथील उद्योजकांचे अनेक प्रश्न आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील एमआयडीसी मधील  उद्योजकांच्या विविध प्रश्नांबाबत अहमदनगर शहरातील  उद्योजकांच्या शिष्टमंडळाची राज्याचे उद्योगमंत्री  सुभाष देसाई यांची राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी घडवून दिली. सोनई (ता. नेवासे) येथील मुळा शैक्षणिक संस्थेचे आमराई विश्रामगृह येथे मंत्री देसाई, मंत्री गडाख व उद्योजकांची बैठक पारपडली. 

हेही वाचा...

यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर चे अध्यक्ष डॉ. अरविंद पारगावकर यांनी एमआयडीसी प्राधिकरण  व ग्रामपंचायतची दुहेरी कर वसुली, महावितरणची व्यापारी व औद्योगिक क्षेत्रातील वीजबिल दरवाढ, अहमदनगर औद्योगिक क्षेत्राचे विस्तारीकरण, पर्यावरण रक्षणासाठी रिसायकलिंग क्षेत्रातील उद्योगांना सहकार्य, लघुउद्योगांकरिता फ्लॅटेड रुफशेड साठी मंजुरी आदी मागण्यांचे निवेदन दिले. 

आमी संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रलंबित 168 प्लॉटधारकांचाकामगारांचा प्रश्न,औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन 40 वर्ष जुनी असून तिचे नूतनीकरण, ESIC चे नगर येथे कार्यालय व कामगारांकरिता पाचशे  बेडचे हॉस्पिटल व्हावेएमआयडीसी करिता स्वतंत्र नवीन पोलीस चौकी करणे आदी मागण्यांवर चर्चा करून निवेदन दिले.

यावेळी आगामी काळात या विविध प्रश्नांबाबत मुंबईत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन यावेळी मंत्री देसाई यांनी उद्योजकांना दिले.

उद्योजकांनी मानले मंत्री गडाखांचे आभार

मंत्री शंकरराव गडाख यांनी उद्योजकांच्या अडचणबाबत चर्चा करण्यासाठी  उद्योगमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची प्रत्यक्ष भेट घडवून अडचणीबाबत चर्चा सोडविण्याबाबद  सहकार्य केले. याबद्दल मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रीकल्चर व आमी संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी मंत्री गडाख यांचे आभार मानले. 

अहमदनगर जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढीकरिता पूरक सोई सुविधा उपलब्ध करणे तसेच नगर जिल्ह्यातील एमआयडीसी'च्या प्रलंबित प्रश्नांबाबत उद्योग मंत्री सुभाष देसाई सकारात्मक असून लवकरच ही बैठक मुंबईत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 
- शंकरराव गडाख, मंत्री, मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in