मंत्री गडाखांनी सोडविली विजेची समस्या

नेवासे तालुक्यातील जैनपूर, बेलपिंपळगाव, बेलपांढरी व परिसरात थ्रिफेज योजना होती.
मंत्री गडाखांनी सोडविली विजेची समस्या
gadakh.jpg

नेवासे : अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र वीज पोचली आहे. मात्र ही वीज पोचविताना महावितरणनकडून अजूनही काही ग्रामीण भागांत थ्रिफेज वीज जोडणीच दिलेली आहे. भारनियमनाचे वेळापत्रकही थ्रिफेजला असल्याने ग्रामीण भागातील रहिवाशांना वीज जोडणी असूनही घरात अंधार आहे. 

नेवासे तालुक्यातील हीच समस्या मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांना समजली. नेवासे तालुक्यातील जैनपूर, बेलपिंपळगाव, बेलपांढरी व परिसरात थ्रिफेज योजना होती. मंत्री गडाख यांनी पाठपुरावा करत सिंगल फेज योजना बुधवारी (ता. एक) कार्यान्वित केली. 

हेही वाचा...

काल (गुरुवारी) मंत्री गडाख यांनी जैनपूर येथे भेट देऊन सिंगल फेज योजनेची पाहणी करीत ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी भेटीदरम्यान गडाख यांचा सत्कार करीत आभार व्यक्त केले. नेवासे तालुक्यातील बेलपिंपळगाव, जैनपूर, बेलपांढरी या गावांमधील वाड्या-वस्त्यांवर सिंगल फेज वीजपुरवठ्याअभावी ग्रामस्थांची गैरसोय होत होती. याबाबत ग्रामस्थांनी मंत्री गडाख व युवा नेते प्रशांत गडाख यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. 

दरम्यान, या भागातील ग्रामस्थांची अडचण ओळखून ती दूर करण्यासाठी गडाख बंधूंनी प्रयत्न करीत प्रश्न मार्गी लावला. अनेक वर्षांपासून अंधारात असलेल्या वाड्या-वस्त्यांवरील परिसर सिंगल फेज योजनेमुळे उजळल्याने या गावांतील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

हेही वाचा...

यावेळी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर, जैनपूरचे सरपंच सुरेश डिके, घोगरगावचे सरपंच सदाशिव बहिरट, बेलपिंपळगावचे सरपंच निकिता व चंद्रशेखर गटकळ, लक्ष्मण गारुळे, सतीश पटारे, राधाकिसन बहिरट, राधाकिसन साप्ते, आप्पासाहेब पटारे, बंडू चौगुले, कृष्णा शिंदे, भाऊ पाटील घुगे, राजेंद्र नागरे, दत्तात्रेय नागरे, कडूबाळ डिके, संदीप डिके, डॉ. देविलाल गरुटे आदी उपस्थित होते. 


अनेक वर्षांपासून जैनपूर, बेलपिंपळगाव, बेलपांढरी व परिसरातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांची सिंगल फेज वाहिनीची मागणी होती. हा प्रश्‍न मंत्री शंकरराव गडाख यांनी कायमचा सोडविला आहे. 
- निकिता गटकळ, सरपंच, बेलपिंपळगाव, ता. नेवासे  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in