शिवसेनेला नगर जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष करण्यासाठी मंत्री गडाखांनी कसली कंबर
gadakh.jpg

शिवसेनेला नगर जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष करण्यासाठी मंत्री गडाखांनी कसली कंबर

कोंभळी (ता.कर्जत) येथे युवा सेना तालुकाप्रमुख दीपक गांगर्डे यांच्या निवासस्थानी आयोजित घोंगडी बैठकीत मंत्री शंकरराव गडाख सहभागी झाले.

मिरजगाव (ता. कर्जत) : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून त्यांनी ग्रामीण भागात पक्ष बांधणीवर जोर दिला आहे. त्यासाठी त्यांनी बैठकांचे सत्र जिल्हाभर सुरू केले आहे. 

याचाच एक भाग म्हणून कोंभळी (ता.कर्जत) येथे युवा सेना तालुकाप्रमुख दीपक गांगर्डे यांच्या निवासस्थानी आयोजित घोंगडी बैठकीत मंत्री शंकरराव गडाख सहभागी झाले. तेथे त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, कर्जत तालुका प्रमुख बळीराम यादव, युवसेना तालुकाप्रमुख दीपक गांगर्डे, अमृत लिंगडे, पंचायत समिती सदस्य प्रशांत बुद्धिवंत आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा...

मंत्री गडाख म्हणाले, विकासकामे व सर्वसामान्याचे प्रश्न सोडवत पक्ष संघटना बळकट करून शिवसेनेला फक्त तालुक्यात आणि जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात नंबर एकचा पक्ष करायचा आहे.

शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवत पक्षसंघटना बळकट करायची आहे. परिसरातील प्रश्न वैयक्तिक लक्ष घालून सोडविणार आहे. विकास कामात आम्ही सदैव पुढे राहू. सर्वांनी पक्षबांधणीच्या कामाला आता जोमाने लागले पाहिजे." 

हेही वाचा...

चिंचोली रमजान येथील युवसेनेच्या शाखेचा शुभारंभ यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यकर्त्यांचे कौतुक
कर्जत तालुक्यात शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम यादव, युवसेना तालुका प्रमुख दीपक गांगर्डे आणि शिवसैनिक पक्ष बांधणीसाठी घेत असलेल्या परिश्रमाचे विशेष कौतुक मंत्री गडाख यांनी यावेळी केले. मंत्री गडाख यांच्यामुळे शिवसेनेची ग्रामीण भागातील ताकद वाढू लागली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. गडाखांच्या शिवसंपर्क अभियानाला जिल्ह्याभराच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in