मंत्री गडाख ठरणार नेवाशाचे भगीरथ : या प्रकल्पासाठी मंत्री गुलाबराव पाटलांकडे पाठपुरावा - Minister Gadakh to be Bhagirath of Nevasa: Follow up with Minister Gulabrao Patil for this project | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

मंत्री गडाख ठरणार नेवाशाचे भगीरथ : या प्रकल्पासाठी मंत्री गुलाबराव पाटलांकडे पाठपुरावा

सुनील गर्जे
गुरुवार, 26 ऑगस्ट 2021

नेवासे तालुक्यात चार नवीन व चार जुन्या पाणी योजना तातडीने मार्गी लावण्याबाबत गुरुवार (ता. २६) रोजी मुंबई येथे मंत्री पाटील यांच्या दालनात मंत्री शंकरराव गडाख  उपस्थितीत झालेल्या  बैठक झाली.

नेवासे : जल जीवन मिशन अंतर्गत नेवासे तालुक्यातील सध्या चालू असलेल्या पाणी योजना व नवीन योजनेसाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा पाठपुरावा चालू असलेल्या नेवासे तालुक्यातील योजनेचा नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनाचे सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने सादर करावे अशा सूचना राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत. 

नेवासे तालुक्यात चार नवीन व चार जुन्या पाणी योजना तातडीने मार्गी लावण्याबाबत गुरुवार (ता. २६) रोजी मुंबई येथे मंत्री पाटील यांच्या दालनात मंत्री शंकरराव गडाख  उपस्थितीत झालेल्या  बैठक झाली. यावेळी  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, सह सचिव प्रवीण पुरी, कार्यकारी अभियंता व्ही. डी. वाईकर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता टी. बी. खताळ, यांच्यासह संबधीत अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा...

देवरे व लंकेंनी वाद वाढवू नये

दरम्यान, जल जीवन मिशन अंतर्गत पाच कोटी रुपयांच्या वरील कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत सर्वेक्षण प्रकल्प अहवाल सादर तयार करण्यासाठी राज्य स्तरावर प्रादेशिक विभाग अन्य एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे.  जिल्हा परिषद एकता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची नेमणूक शासनामार्फत पुढील आठ दिवसात करण्यात येईल ही नेमणूक झाल्यावर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर संबंधित सल्लागार समवेत बैठक आयोजित करण्यात येऊन कामांना गती देण्यात येईल असे यावेळी बैठकीत ठरविण्यात आले आहे.

Edited By - Amit Awari

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख