'मारुतराव घुले पाटलांनी समाजासाठी दिले आयुष्याचे दान'
ghule.jpg

'मारुतराव घुले पाटलांनी समाजासाठी दिले आयुष्याचे दान'

शिवाजी देशमुख महाराज म्हणाले, समाजात अनेक वस्तूंचे दान दिले जातात. परंतु समाजासाठी आयुष्याचे दान देणे हा सर्वात मोठा विषय आहे.

नेवासे : भेंडे (ता. नेवासे) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या 91 व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे प्रमुख  विश्वस्त गुरुवर्य शिवाजी देशमुख महाराज, संत तुकाराम महाराज मंदिराचे प्रमुख उद्धव मंडलिक महाराज, ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, संचालक, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, संचालक अॅड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, शेवगाव'चे सभापती डॉ. क्षितिज घुले, अंकुश महाराज कादे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, भैय्यासाहेब देशमुख,  दिलीप लांडे, बबन भुसारी, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे आदी उपस्थित होते. 

प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांनी लोकनेते घुले पाटील यांचे स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शिवाजी देशमुख महाराज म्हणाले, समाजात अनेक वस्तूंचे दान दिले जातात. परंतु समाजासाठी आयुष्याचे दान देणे हा सर्वात मोठा विषय आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत समाजाच्या हितासाठी आयुष्य वाचणारे लोकनेते मारुतराव घुले पाटलांनी समाजासाठी आपल्या आयुष्याचे दान दिले असे देशमुख महाराज यांनी सांगितले.

हेही वाचा...

मंडलिक महाराज म्हणाले, " सहकार , राजकारणात काम करताना संत ज्ञानेश्वर  माऊलींचा विचार लोकनेते घुले पाटील यांनी  तंतोतंत वापरला. गोर-गरीब, सर्व जाती धर्मांतील लोकांची कामे केली. घुले पाटलांच्या कार्यकुशलता व दूरदृष्टीमुळे नेवासे-शेवगाव तालुक्यासह ज्ञानेश्वर कारखान्याचा परिसर समृद्ध झालेला आहे. त्यांच्या समृद्ध विचारांचा वारसा घुले बंधूंनी समर्थपणे पुढे नेण्याचे काम करीत आहेत.

मुळाचे संचालक भाऊसाहेब मोटे, काशिनाथ नवले, अमोल अभंग,  डॉ.शिवाजी शिंदे, सभापती रावसाहेब कांगुणे, प्रभाकर कोलते, अंबादास कोरडे, रामदास गोल्हार, मच्छिंद्र म्हस्के, रामभाऊ जगताप, काकासाहेब शिंदे, संभाजी पवार, दादा गंडाळ, शिवाजी कोलते, अशोक मिसाळ, सुखदेव फुलारी, दत्तात्रय काळे, गणेश गव्हाणे, संजय कोळगे, बबन धस आदी उपस्थित होते. प्रा. भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले. 

हेही वाचा...

उदयन गडाखांकडून अभिवादन 
लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या जयंती निमित्त आज गडाख परिवार व जिल्हा शिवसेनेचे वतीने युवा नेते उदयन गडाख यांनी भेंडे येथील स्वर्गीय घुले पाटलांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले. तसेच डॉ. नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले पाटील यांची भेट घेतली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in