आरक्षणासाठी मराठा तरुणाची आत्महत्या

मराठा समाजाचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.
आरक्षणासाठी मराठा तरुणाची आत्महत्या
maratha yuvak.jpg

परतूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजातील तरूणांनी राज्यभर मोठे मोर्चे काढले होते. मात्र आधी उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षणाची याचिका फेटाळली. त्यामुळे मराठा समाजात नाराजी आहे. Maratha youth commits suicide for reservation

मराठा समाजाचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. यातच कोरोना टाळेबंदीमुळे बेरोजगारी व यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सुरवातीचा दुष्काळ तसेच नंतरची अतिवृष्टीमुळे होते ती पिकेही हातची गेली आहेत. त्यामुळे शिक्षण असूनही नोकरी नाही व आसमानी संकटांमुळे हाती पीक नाही, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे मराठा तरुणांत निराशेचे वातावरण आहे.

हेही वाचा...

यातच येनोरा येथील सदाशिव शिवाजी भुंबर (वय 25) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदाशिव हा पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता, त्याने इलेक्ट्रिशियनचा कोर्स केलेला आहे. नोकरी मिळत नसल्याने वीस-पंचवीस दिवसांपूर्वी तो गावाकडे येनोरा येथे आला होता. त्याला चार एकर शेती आहे. मात्र गावाकडे ही सतत पाऊस असल्याने शेतातील पिकेही गेली आहे. 

त्यातच मंगळवारी घरच्या छताच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ओला दुष्काळ व मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्‍यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे चुलते अंकुश भुंबर यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

हेही वाचा...

या संदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, येनोरा येथील युवक सदाशिव भूबर हा मराठा आरक्षणासाठी शाहीद झाला आहे. याच्या कुटुंबाला शासनाच्या वतीने दहा लाखांची मदत करावी. 14 सप्टेंबरला रात्री आठच्या सुमारास येनोरा तालुका परतूर येथील युवक सदाशिव शिवाजी भुंबर त्याच्या घरी गळफास घेतला होता. 

जमीन नापीक व त्यात मराठा आरक्षण नसल्याने अनेक वेळेस संधी मिळाली नाही. पुणे येथील खासगी कंपनीत तो काम करत होता पण तो मागील 25 दिवसांपासून येनोरा येथे आला होता. इतर काही तरी व्ययसाय करू असे त्याच्या मनात होते पण भांडवल नसल्याने त्यानी आत्महत्या करण्याचे ठरवले. त्याचा मृत्यू झाला. कुटुंबाला तात्काळ 10 लाखाची आर्थिक मदत करून कुटुंबातील एक व्यक्तीला शासकीय सेवेत घ्यावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने केली आहे. 

निवेदन देताना एकनाथ कदम, पांडुरंग नवल, अशोक तनपुरे, नामदेव तौर, भारत सवणे, राजेश तेलगड, राजू भुजबळ, बाबासाहेब गाडगे, भानुदास टिप्परकर, श्याम बरकुले, श्याम तेलगड सह अनेक मराठा बंधाव उपस्थित होते.

Edited By - Amit Awari

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in