मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे राष्ट्रपतींना भेटणार... हे खासदार सोबत असणार

खासदार संभाजीराजे हे उद्या (ता. 2) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.
sambhaji raje.jpg
sambhaji raje.jpg

पुणे : आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाकडून राज्यभर मराठा क्रांती मोर्चे काढण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देणे घटऩा बाह्य असल्याचे सांगितले. त्यामुळे केंद्राकडून कायदा करून मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी मागणी होत आहे. त्यासाठी कोल्हापूर येथील खासदार संभाजीराजे यांनी आग्रही भुमिका घेतली आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्यासाठी खासदार संभाजीराजे हे उद्या (ता. 2) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी खासदार संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याचे आवाहन केले होते. 

हेही वाचा...

संभाजीराजेंच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन महाराष्ट्रातून शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व काँग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्याने आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी असणार आहेत. 

छत्रपती संभाजीराजे हे सुरूवातीपासून मराठा आरक्षण लढ्यात सक्रीय आहेत. रस्त्यावरील आंदोलनांपासून ते न्यायालयीन लढाईपर्यंत सर्व स्तरांवर ते प्रयत्नशील राहिले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी कुण्या एकाची नसून सर्व पक्षांनी एकत्र येऊन यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज संभाजीराजेंनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षीय हेव्यादाव्यांच्या पलीकडे जाऊन संभाजीराजे मोट बांधत आहेत. 

संसदेत 127 व्या घटनादुरूस्तीवर बोलत असतानाही संभाजीराजे यांनी आरक्षणाबाबत राज्य सरकार व केंद्र सरकारची जबाबदारी स्पष्ट केली. या घटनादुरूस्तीनंतर मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक मागास ठरवून, असाधारण परिस्थिती सिद्ध करून 50 टक्केच्या वरती आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय शिष्टमंडळासह खासदार संभाजीराजे घेत असलेल्या राष्ट्रपतींच्या भेटीकडे सर्व राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com