पारनेर तालुक्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान

सोमवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे ढवळपुरी, वनकुटे, पळशी परिसरात मोठे नुकसान झाले आहे.
पारनेर तालुक्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान
PARNER.jpg

टाकळी ढोकेश्वर : अहमदनगर जिल्ह्यात मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाला. यात शेवगाव, पाथर्डी व नगर तालुक्यातील काही गावांत पुराचे पाणी आले. त्यामुळे मोठी आर्थिक नुकसान झाली. हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाने नागरिकांना चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे. काल रात्री 11 वाजेपासून पहाटे 4 वाजेपर्यंत म्हणजे सुमारे पाच तास पारनेर तालुक्यात पाऊस झाला. या दमदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सोमवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे ढवळपुरी, वनकुटे, पळशी परिसरात मोठे नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली आली आहे. येथील परिसरातील दोन पुलही पुराच्या पाण्यात वाहुन गेले आहेत.

हेही वाचा...

याबाबत माहिती अशी की, काल रात्री अकरा ते आज पहाटे चार वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे जिर्ण झालेल्या घरांची पडझड झाली आहे.पाळीव प्राण्यांनाही या अतिवृष्टीचा फटका बसला असून शेतामधील शेतमालाचेही मोठे नुकसान झाले असल्याची माहीती वनकुटे चे सरपंच अ‍ॅड राहुल झावरे यांनी दिली.

दुर्गम असलेल्या या भागात वनकुटे ते ढवळपूरी तसेच पळशी ते वनकुटे असे ग्रामसडक योजनेमधून रस्ते तयार करण्यात आलेल्या या मार्गावरील काळू नदीवर बांधण्यात आलेले पुल पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे या भागाचा संपर्क तुटला आहे.

शेतातील सोयाबीन, बाजरी, मूग, वांगी, टोमॅटो या मालाचे नुकसान झाले आहे. एखादी वाईट घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने पूल दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी पळशीचे उपसरपंच अप्पा शिंदे यांनी केली आहे.

खडकवाडी परीसरातील नुकताच लावण्यात आलेल्या कांदा व ऊस,बाजरी पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे याचेही तात्काळ पंचनामे करण्याची मागणी सेवा संस्थेचे संचालक इंद्रभान ढोकळे यांनी केली आहे.घरांची पडझड, तसेच शेतमालच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधितांना मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे यांनी सांगितले.

हेही वाचा...

कान्हुर पठार परीसरात मुसळधार पावसाने कांदा पिकाचे नुकसान केले आहे. गावातील जंजळ व बाजार तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.अतिवृष्टी आणि पिकांचे झालेल्या नुकसानीबाबत आमदार नीलेश लंके यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्याबद्दल सूचना दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in