ज्योती देवरे यांच्या 5 कोटी 94 लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराची लोकायुक्ताकडे तक्रार

तहसीलदार देवरे यांनी ऑडिओत नीलेश लंके यांचे नाव न घेता आरोप केले होते.
devre vs lanke.jpg
devre vs lanke.jpg

अहमदनगर ः तहसीलदार ज्योती देवरे यांचा ऑडिओ व्हायरल झाल्यापासून आमदार नीलेश लंके यांच्या विरोधात राजकीय वातावरण तापले आहे. अशातच ज्योती देवरे यांचीही जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे. देवरे ऑडिओ प्रकरणामुळे पारनेर तालुक्यातील राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे.

तहसीलदार देवरे यांनी ऑडिओत नीलेश लंके यांचे नाव न घेता आरोप केले होते. त्यामुळे आमदार लंके समर्थक तहसीलदार देवरे यांच्या विरोधात रोज नवीन काहीतरी करत असलेले दिसून येत आहेत. अशातच आमदार लंके यांचे समर्थक समजल्या जाणाऱ्या अॅड. राहुल झावरे, संदीप चौधरी, ज्ञानेश्वर लंके, सुहास साळके यांनी प्रसिध्द विधीतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्या मार्फत मुंबईतील लोकायुक्तांकडे एक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तहसीलदार देवरे यांनी पाच कोटी 94 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा...

या याचिके संदर्भात अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले, पदाचा गैरवापर करणे, पदाचा वापर करून स्वतःसाठी झटपट पैसे कमविण्याचे साधन म्हणून ते वापरणे, लोकांवर दबाव टाकून मुद्दाम त्रास देण्यासाठी त्यांची वाहने बेकायदेशीर रित्या पकडणे, वाळू उत्खनन करणारे यंत्र बेकायदेशीरपणे सोडून देण्यासाठी पैसे घेण्याचा जो प्रकार आहे, त्यामुळे 5 कोटी 94 लाख रूपये एवढा मोठा घोटाळा समोर येत आहे.

हेही वाचा...

देवरे यांनी धुळे शहरात तहसीलदार असताना हजार कोटीच्या जमिनींचा गैरव्यवहार केला आहे. तिथल्या चौकशीतही निष्पन्न झाले आहे की, त्यांनी चुकीचे काम केले आहे. त्यामुळे या भ्रष्टाचारा विरोधात मुंबईतील लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे. त्याची लवकरात लवकर सुनावणी होईल, असे अॅड. सरोदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com