ग्रामसभेत विखे समर्थकच परस्परात भिडले

गावात कोणती विकासकामे करायची हे मात्र ग्रामसभेला ठरवावे लागते. त्यामुळे गावातील राजकारण कमालीचे वाढले आहे.
ग्रामसभेत विखे समर्थकच परस्परात भिडले
Sarkarnama shrirampur.jpg

अहमदनगर : ग्रामसभांना विविध विकास कामे करण्याचे सर्व अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या मंजुरीसाठी थांबण्याची अवश्यकता उरलेली नाही. त्यामुळे ग्रामसभांचे महत्त्व वाढले आहे. गावात कोणती विकासकामे करायची याचा निर्णय ग्रामसभेतच होऊ लागल्याने विकासाची शिदोरी सरपंचांच्या व ग्रामसदस्यांच्या हाती आली आहे.

गावात कोणती विकासकामे करायची हे मात्र ग्रामसभेला ठरवावे लागते. त्यामुळे गावातील राजकारण कमालीचे वाढले आहे. गावातील दोन गट विकासकामे मिळविण्यासाठी ग्रामसभांत आग्रही मत मांडत आहेत. कधी कधी हे मत मांडताना अतिरेक होतो आणि दोन गटांत बाचाबाची होते. 

हेही  वाचा...

असाच काहीसा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात असलेल्या मांडवे गावातील ग्रामसभेत घडला.

श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे गावची ग्रामसभा वादळी ठरली आहे. विकासकामातील भ्रष्टाचाराच्या मुद्दयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ‌चांगलीच जुंपली. सत्ताधारी गटातील महिला सरपंच पुष्पा चितळकर आणि महिला सदस्यांच्या पतीदेवांनी ग्रामसभेत सहभाग घेत विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने दोन्ही गटात खडाजंगी झाली. विषेश म्हणजे दोन्ही गट विखे समर्थक आहेत.

ग्रामसभेत कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले. प्रचंड गोंधळामुळे ग्रामसभा आटोपती घ्यावी लागली. यावेळी कोरोना असल्याचे भानही नागरिकांना राहिलेले नव्हते. कोरोनाची दुसरी लाट भयंकर होती. तिसरी लाट येईल असे तज्ज्ञांचे मत आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन होत असताना मांडवेत वेगळेच चित्र होते. 

हेही वाचा...

कोरोना नियमांना ग्रामसभेमध्ये केराची टोपली सोशल डिस्टन्स पालन नाही तर अनेकांच्या तोंडाला मास्कही नव्हते. या बाबतचा व्हिडिओ आज सोशल मीडियावरून जोरदार व्हायरल झाला. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील कोरोनाची भीतीच संपली काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in