सुजित झावरे यांच्या कामाचा राज्यपालांनी केला गौरव

झावरे यांनी केलेल्या नदीजोड योजणेची प्रथम अनेकांनी खिल्ली उडविली. मात्र तिच्या य़शस्वीतेनंतर अनेकांनी या योजनेची वहावाही केली
सुजित झावरे यांच्या कामाचा राज्यपालांनी केला गौरव
sujit zaware.jpg

पारनेर ः  पारनेर तालुका हा सततचा दुष्काळी तालुका आहे, असे असतानाही तालुक्यात म्हणावे असे पावसाचे पाणी अडविण्याची तसेच जलसंधारणाची कामे झाली नाहीत. मात्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे पाटील यांनी ओढे तसेच नदीचे पाणी एकत्र करून नदीजोड प्रकल्प संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणली. या पथदर्शी  योजणेच्या य़शस्वीतेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी झावरे यांना मुंबईत सन्मानित केले.The Governor praised the work of Sujit Zaware
     
झावरे यांनी  केलेल्या  नदीजोड योजणेची प्रथम अनेकांनी खिल्ली उडविली.  मात्र तिच्या य़शस्वीतेनंतर अनेकांनी या योजनेची वहावाही केली. अशा प्रकारच्या योजना राज्यात राबविणे गरजेचे आहे.  या बाबतीची माहिती झावरे यांनी राज्यपालांना दिली होती. तालुक्यात पावसाचे प्रमाण खूप कमी आहे.  तरी सुद्धा तालुक्यात म्हणाव्या अशा जलसंधारणाच्या योजना झाल्या नाहीत. पावसाचे वाया जाणारे पाणी अडविण्याचा प्रयत्न झाला नाही. अशा स्थितीत काही दिवसांपूर्वी झावरे यांनी नदीचे, ओहोळाचे वाया जाणारे पाणी  जर एकत्र केले तर अनेक पाझर तलाव, बंधारे भरुन शेतकऱ्यांना फायदा होईल हे लक्षात घेऊन त्यांनी ती नदीजोड योजणेची संकल्पना प्रत्यक्षात आणली.  

हेही वाचा...

तालुक्यातील काळकूप पाडळी या ठिकाणी हा नदीजोड प्रकल्प विजेचा वापर न करता तसेच यंत्र न वापरता केवळ नैसर्गिक उताराच्या सहाय्याने कार्यान्वित केला आहे. त्याची फलनिष्पत्ती अशी झाली  की पहिल्याच पावसात प्रयोग यशस्वी झाल्यानंतर दोन पाझर तलाव व आठ बंधारे भरले आहेत. त्या नंतर वासुंदे गावाजवळील कर्जुले पठारावर वाया जाणारे अनेक ओहोळ एकत्र करुन कालव्याद्वारे पाझर तलावात सोडले  हा प्रयोग यशस्वी झाला असून पहिल्याच पावसात तलाव साधारण ५० टक्के तो  भरला.


राज्यपालांना ही योजणा  आवडल्याने त्यांनी  झावरे  यांना पत्र पाठवून  प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी राजभवन येथे आमंत्रित केले होते. आज राजभवन येथे राज्यपाल  कोशियारी  यांनी जलसंधारणाच्या अतुलनीय कार्याबद्दल झावरे  यांना सन्मानित केले. भौगोलिकदृष्ट्या जिथे शक्य आहे अशा गावांमध्ये असे नदीजोड प्रकल्प राबविले पाहिजेत. या प्रकल्पामुळे अनेक गावे जलसंधारणाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होतील.  ही बाब  राज्यपालांना पटवून दिल्या नंतर  त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून  अशा पध्दतीचे नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यासाठी स्वतंत्र बजेट निर्माण करावे, असे कळविल्याचेही झावरे यांनी सकाळशी बोलताना सांगितले. या वेळी  भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुदेश झावरे पाटील, बिहारचे माजी मंत्री शिवप्रताप सिंह आदी उपस्थित होते.

Edited By - Amit Awari

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in