अखेर झेडपीची लिफ्ट सुरू झाली

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा वादळी चर्चाही झाली होती. ही लिफ्ट सुरू झाल्य़ामुळे वादावर पडदा पडला असला तरी एवढा अवधी का लागला असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
अखेर झेडपीची लिफ्ट सुरू झाली
Nagar ZP.jpg

अहमदनगर ः जिल्हा परिषदेतील नादुरुस्त लिफ्टच्या जागेवर अखेर नवीन लिफ्ट बसली असून, आज तिचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांच्या हस्ते करण्यात आले. हुश्‍श! एकदाची लिफ्ट सुरू झाली, अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित असलेसे कर्मचारी व अभ्यागतांनी दिली. या लिफ्टच्या मुद्द्यावरू विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा वादळी चर्चाही झाली होती. ही लिफ्ट सुरू झाल्य़ामुळे वादावर पडदा पडला असला तरी एवढा अवधी का लागला असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

जिल्हा परिषदेतील लिफ्टची मुदत संपूनही ती तात्पुरती दुरुस्ती करून वापरात आणली जात होती. मात्र, कोरोना संकटात लिफ्ट बंद करण्यात आली. ती बंद ठेवण्यात आली. त्यानंतर लिफ्टच्या कामासाठी घसारा निधीतून रकमेची तरतूद करण्यात आली. मात्र हे काम अनेक नियमांच्या जोखडात अडकत गेले. अखेर ते पूर्ण झाले असून, आज नवीन लिफ्ट कार्यान्वित करीत तिचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती सुनील गडाख, सभापती काशिनाथ दाते, सभापती मीरा शेटे, सभापती उमेश परहर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते.

हेही वाचा...

लिफ्ट बंद असल्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसह दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक अभ्यागतांचे हाल होत होते. या संदर्भात ‘सकाळ’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध करून प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला.


गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेतील लिफ्टचा प्रश्‍न प्रलंबित होता. तो मार्गी लावण्यात आला आहे. घसारा निधीतून लिफ्टचे काम करण्यात येत असल्यामुळे थोडा अवधी लागला असला, तरी काम ‘लेट’ पण ‘थेट’ झाले आहे.
- काशिनाथ दाते, सभापती, बांधकाम समिती


प्रलंबित असलेला लिफ्टचा प्रश्‍न आपण मार्गी लावला आहे. जिल्हा परिषदेत येणाऱ्या दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी याचा फायदा होणार आहे.
- राजश्री घुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद

‘सकाळ’चा पाठपुरावा
जिल्हा परिषदेतील लिफ्ट नादुरुस्त असल्यापासून ते थेट लिफ्ट सुरू होईपर्यंत ‘सकाळ’ने पाठपुरावा सुरू ठेवून प्रशासनाला काम मार्गी लावण्यास भाग पाडले. जिल्हा परिषदेतील लिफ्ट कार्यान्वित झाल्यामुळे सर्वांचाच प्रश्‍न मार्गी लागला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in