utara.jpg
utara.jpg

शेतकऱ्यांना 7/12 उतारा मोफत मिळणार पण...

वेळेत उतारे मिळत नसल्याने तलाठ्यांनाच नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते.

अहमदनगर : शेतकरी व मालमत्ताधारकांना विविध कामांसाठी तलाठी व तहसीलदारांकडे 7/12 उतारा आणण्यासाठी जावे लागते. त्यावेळा नागरिकांना लवकर 7/12 उतारा मिळत नाही. उतारा मिळविण्यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात. यातच उतारे डिजिट लायईज झाल्यापासून सर्व्हर समस्येमुळे उतारे वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. सर्व्हर बाबत तलाठी संघटनांनीही राज्य सरकारकडे तक्रारी केल्या आहेत. वेळेत उतारे मिळत नसल्याने तलाठ्यांनाच नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. 7/12 उतारे शेतकऱ्यांना घरपोच मिळणार आहेत. 

ही सर्व बाब लक्षात घेऊन राज्य सरकारच्या महसूल विभागाने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या आदेशात म्हटले आहे की, राज्याच्या आर्थिक उभारणीतील शेतकऱ्यांचे योगदान विचारात घेऊन 2 ऑक्टोबर 2021 या महात्मा गांधी यांच्या जयंती पासून राज्य सरकारने डिजीटल 7/12 देण्यासाठी विशेष मोहिमेचे नियोजन केले आहे. त्यानुसार डिजीटल भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, ई-महाभूमी अंतर्गत विकसीत करण्यात आलेल्या आज्ञावलीमधून संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीने 7/12 गावामध्ये संबंधीत तलाठ्यामार्फत प्रत्येक खातेदारास घरोघरी जाऊन मोफत देण्यात येणार आहेत.

हेही वाचा...

ही विशेष मोहिम राबविण्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 आणि त्याखालील नियम या अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारात याव्दारे शासनाची मान्यता देण्यात आली आहे. या मोहिमेचा प्रारंभ 2 ऑक्टोबरला करण्यात येईल, यासाठी सर्व संबंधितांना आवश्यक ते तांत्रिक सहाय्य पुरविण्याची जबाबदारी पुण्यातील भूमी अभिलेख जमाबंदी आयुक्त आणि संचालकांची राहील.

7/12 अद्यावत उताऱ्याच्या प्रती उपलब्ध करून देण्यासाठी येणारा खर्च हा जिल्हा नियोजन समितीकडील निधीमधून उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची जबाबदारी प्रत्येक जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष 2021-2022 निमित्ताने राबविण्यात येणाच्या या विशेष मोहिमेतर्गत 7/12 उताऱ्याची अद्यावत प्रत एका खातेदारास फक्त एकदाच मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in