तनपुरे साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे विखेंविरोधात आंदोलन

राहुरी फॅक्टरी येथे आज (सोमवारी) डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या २०० कामगारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी आंदोलन सुरु केले.
तनपुरे साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे विखेंविरोधात आंदोलन
Sarkarnama (4).jpg

राहुरी : डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांची खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने घोर फसवणूक केली. मागील पाच वर्षात वेतन व इतर २५ कोटी ३६ लाख रुपये घेणेबाकी आहे. आता थकबाकी घेईपर्यंत हटणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत थांबणार नाही. आठ दिवस विविध तीव्र आंदोलने करुन, खासदार डॉ. विखे यांचे डोळे उघडले नाही. तर, आंम्ही सामुदायिक आत्मदहन करु." असा इशारा कामगार नेते इंद्रभान पेरणे यांनी दिला.

राहुरी फॅक्टरी येथे आज (सोमवारी) डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या २०० कामगारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी आंदोलन सुरु केले. याप्रसंगी ते बोलत होते. अन्नत्याग करून आमरण उपोषणाला बसलेले सचिन काळे, सिताराम नालकर, राजू सांगळे, बाळासाहेब तारडे, नामदेव शिंदे, सुरेश तनपुरे उपस्थित होते. 

हेही वाचा...

पेरणे म्हणाले, "खासदार डॉ. विखे यांनी वेळोवेळी कामगारांना शब्द दिला. माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील कामगारांच्या घामाचा एक रुपयाही बुडवणार नाही. विखे कुटुंबाने दिलेला शब्द पाळला नाही. असे आमच्या तीन पिढ्यांत कधी घडले नाही. यापुढेही घडणार नाही. असे सांगितले.  त्यावर विश्वास ठेवून कामगारांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन, कारखान्यांचे गळीत हंगाम यशस्वी पार पाडले.   तुटपुंज्या वेतनात, कुटुंबाला अर्धपोटी ठेवून काम केले. आता त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मागील पाच वर्षातील कामगारांची थकबाकी द्यावी. श्रमजीवी कामगारांचा अंत पाहू नये."

कामगार नेते सचिन काळे म्हणाले, "आम्ही कामगारांनी आंदोलन सुरू करण्यापूर्वी शनी देवाच्या डोक्यावर हात ठेवून, शेवटच्या क्षणापर्यंत मागे हटणार नाही. अशी शपथ घेतली आहे.  आता आमचे आंदोलन कोणताही राजकीय नेता मोडू शकत नाही.  सेवेतील कायम कामगार, सिझनल कामगार, मजुरी हजेरी वरील कामगार, निवृत्त कामगार आंदोलनाला बसले आहेत." 

जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, देवळाली प्रवराचे नगरसेवक आदिनाथ कराळे, ज्ञानेश्वर वाणी यांनी आंदोलकांना पाठिंबा दिला.  पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी आंदोलनस्थळी अनुचित प्रकार घडू नये. म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. या आंदोलनाची महाराष्ट्रभर चर्चा आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in