लोकप्रतिनिधी व तहसीलदार यांच्या वादात जनता वेठीला धरू नका 

त्या दोघांच्या वादात जनता वेठीस नको व तालुक्याची बदनामी नको असे निवेदन शिवसेना व भाजप पदधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना काल (गुरुवारी) दिले.
parner nivedan.jpg
parner nivedan.jpg

अहमदनगर ः पारनेर हा सेनापती बापट व जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे नाव लौकिक असलेला तालुका आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून लोकप्रतिनिधी तहसीलदार व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचेतील वाद आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थितीमुळे सोशल, प्रिंट राज्याभरातील इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तालुक्याची बदनामी झाली आहे हे सर्व थांबवा. या दोघांच्या वादात जनता वेठीस नको व तालुक्याची बदनामी नको असे निवेदन शिवसेना व भाजप पदधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना काल (गुरुवारी) दिले. Don't get involved in disputes between people's representatives and tehsildars

यावेळी जिल्हा परिषदेतील बांधकाम व कृषी विभागाचे सभापती काशिनाथ दाते, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, जिल्हा परिषदेचे जलव्यवस्थापन समिती सदस्य राहुल शिंदे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास रोहकले, पंचायत समिती सदस्य डाॅ. श्रीकांत पठारे, शंकर नगरे, संतोष येवले, सखाराम उजागरे, सागर मैड, सुनील थोरात उपस्थित होते.

हेही वाचा...

निवेदनात म्हणले आहे की, तालुक्यात गेली दोन वर्षांपासून महसूल, पोलिस हे पूर्णपणे एकतर्फी कामकाज करत आहे. त्याची झळ तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला पोहचत आहे. वाळू तस्करी, अवैध धंदे व चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिस खाते तर निरापराध लोकांना अपराधी समजून धमकावत आहे. खोटे गुन्हे दाखल करण्याचे कामे सुरू आहे. तहसील व पोलिस कार्यालयाचे आसपास सतत वाळू तस्कर, अवैध व्यवसायिक व दलालांचा वावर आहे. यामुळे सर्वसामान्य जनता दबावात व त्रस्त आहे.

तहसीलदार यांचे तक्रारीत गौणखनिज अधिकारी व त्यांचे सहकारी यांना पोलिस निरीक्षक यांच्यासमोर झालेली मारहाण व ग्रामीण रूग्णालयातील दोन महिला वैद्यकीय अधिकारी यांना शिवीगाळ व राहुल पाटील नावाचे कर्मचाऱ्याला झालेली मारहाण व ती ही गटविकास अधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्यासमोर असा आरोप आहे.

हेही वाचा...

ही बाब अत्यंत गंभीर असून याची चौकशी समिती नेमून निःपक्ष चौकशी व्हावी. चौकशीत सत्यता असेल तर दोषींवर कारवाई करावी व आरोप खोटे निघाल्यास लोकप्रतिनिधीची नाहक बदनामी केली म्हणुन संबंधित कर्मचारी यांचे निलंबन करावे.

तहसील कार्यालयीन कर्मचारी, मंडलाधिकारी व तलाठी यांनी वरिष्ठांचे विरोधात काम बंद आंदोलन करून जनतेला वेठीस धरले आहे. त्यांचे वाद मिटणार नसतील तर तहसीलदार व आंदोलक कर्मचारी यांच्या सर्वांच्या तालुक्याबाहेर बदल्या कराव्यात अन्यथा कायदेशीर कारवाई करावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com