'देवरे व लंकेंनी वाद वाढवू नये'

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक तथा प्रमुख सल्लागार ग. दि. कुलथे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊनपारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणाची महिती घेतली.
'देवरे व लंकेंनी वाद वाढवू नये'
devre vs lanke.jpg

अहमदनगर ः  महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक तथा प्रमुख सल्लागार ग. दि. कुलथे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणाची महिती घेतली. त्यानंतर कुलथे यांनी  देवरे व आमदार नीलेश लंके यांच्या बद्दल महत्त्वाचे  वक्तव्य केले आहे.

कुलथे म्हणाले, की पारनेरचे आमदार नीलेश लंके खूप काम करणारे व चांगले आमदार आहेत. त्याच बरोबर तहसीलदार ज्योती देवरे स्वाभिमानी अणि उत्तम काम करणाऱ्या अधिकारी आहेत. त्यांच्या संदर्भातील भ्रष्टाचाराचा जो प्रचार सुरू आहे, तसे काहीही नाही. हे आम्ही जाणून घेतले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व तहसीलदार यांनी सामोपचाराने जनतेची कामे करायची असतात. त्यांना भांडणात रस नसतो. जनतेला त्यांचे प्रश्न सुटण्यात रस असतो. तर लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी न भांडता समन्वय ठेवून काम करावी म्हणजे जनतेची कामे चांगल्या प्रकारे मार्गी लागतील, असे आमच्या अधिकारी महासंघाचे धोरण आहे. त्यामुळे यामध्ये लोकप्रतिनिधी व तहसीलदार देवरे यांनी समन्वयाने काम करावे. वाद वाढवू नये. जनतेच्या हितासाठी काम करावे, असे कुलथे यांना सांगितले.

हेही वाचा...


सेल्फीचा वाद वाढतोय
आमदार लंके यांची काल नागपूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यावेळी आमदार लंके यांनी फडणवीस यांच्या समवेत सेल्फी काढला. हा सेल्फी कमालीचा व्हायरल झाला. पारनेरमध्ये तर भाजपने दोन पावले माघार घेतल्याची चर्चा रंगली. तशा पोस्टही सोशल मीडियावर फिरू लागल्या. काही वृत्तपत्रांच्या ई आवृत्तीत तर भाजपने दोन पावले माघारीचे वृत्तही प्रसिद्ध करण्यात आले. यावर काल (बुधवारी) चित्रा वाघ यांनी ट्विट करत आमदार लंके यांना सुनावले आहे.

देवरें विरोधातील आंदोलन सुरूच
तहसीलदार देवरे यांची पारनेर मधून बदली करा अथवा आम्हा सर्वांची बदली करा. या मागणीसाठी पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचारी व तलाठी कालपासून तहसील कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करत आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. देवरे यांनी नायब तहसीलदारांच्या मदतीने महसूलचे काम सुरळीत ठेवण्यात येईल, असे सांगितले आहे. तहसीलदार देवरे या महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या कार्याध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे हा संघर्ष अधिकारी संघटना विरोधात कर्मचारी संघटना असा सुरू झाला आहे. देवरे यांनी कर्मचारी राजकीय दबावाखाली आंदोलन करत असल्याचा आरोप केला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in