कोरोना वादळात उरलय फक्त एक सून, तिची दोन पिले आणि आयुष्यभर न फिटणारे कर्ज

कोरोना विध्वंसाचे उदाहरण देणारी छायाचित्रासह एक पोस्ट काल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर टाकली. ही पोस्ट राज्यभर व्हायरल झाली आहे.
ekhande.jpg
ekhande.jpg

अहमदनगर : कोरोना कॉलर ट्यून ऐकून सर्वांनाच काय रोज तेच ते, असे वाटत असेल. काहींनी तर कोरोना हद्दपार झाल्याच्या आत्मविश्वासात वागायला सुरवात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अहमदनगर जिल्ह्यात एकाच दिवशी 100 पेक्षाही जास्त मृतदेहांचे अंत्यसंस्कार करावे लागत होते. ते पेटती सरण आपण विसरलाही असाल पण ज्यांचे आप्त गेले ते कसे विसरतील. आयुष्याच्या भळभळत्या जखमा कशा भरतील. कोरोनाची दाहकता सांगणारा आणखी एक आघात काल अकोले तालुक्यातील एका कुटूंबावर झाला आणि उरलयं फक्त दुःख व संघर्ष. कुटूंबीयांना आयुष्यभरासाठी.

याचेच उदाहरण देणारी छायाचित्रासह एक पोस्ट काल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर टाकली. ही पोस्ट राज्यभर व्हायरल झाली आहे. 

हेही वाचा...

कुलकर्णी यांनी चार महिन्यां पूर्वी एखंडे कुटूंबातील दोन कर्ते पुरूष एका मागे एक गेल्याने त्या कुटूंबावर आलेल्या संकटावरील पोस्ट व्हायरल केली होती. त्याच कुटूंबातील ज्येष्ठ महिलाही कोरोनाने गेली आहे. कोरोनाच्या या वादळानंतर आता उरलेत केवळ एक विधवा महिला, तिची दोन पिले आणि आयुष्यभरही फिटणार नाही असे कर्ज... 

हेरंब कुलकर्णी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोरोनातील मृत्यूची वेदना किती टोकाची असू शकते,याचे भीषण उदाहरण आज बघायला मिळाले. काही दिवसांपूर्वी मी हा फोटो टाकला होता व या महिलेचे पती 1 मे रोजी कोरोनाने वारले व 4 मे रोजी त्यांचा मुलगा कोरोनाने वारला व फोटोत दिसणाऱ्या या बाई विडी वळून पाच लाख रुपये कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत आहेत, असे लिहिले होते पण आज त्या बाईंचा कोरोनाने मृत्यू झाला.

हेही वाचा...

पती आणि मुलगा ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. तिथेच या कोरोना ने एडमिट झाल्या व आज मृत्यूशी झुंज संपली. कोरोनाने केवळ चार महिन्यात या घरातील आई वडील व मुलगा यांना नेले आहे व पाठीमागे पाच लाखांचे कर्ज झाले आहे.

आता फक्त त्या घरात सून आणि तिची दोन लहान मुले उरली आहेत. 20 गुंठे जमीन इतकीच फक्त इस्टेट आहे आणि दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून बाई आता पाच लाखांचे कर्ज फेडणार आहेत. मुलांना शिकवणार आहेत. जगणार आहेत आणि चार महिन्यांत झालेल्या तीन मृत्यूचे दुःख पचवणार आहेत. कोरोनाच्या वेदनेच्या हिमनगाचे हे फक्त टोक आहे तरीसुद्धा शासनाला कोरोनाने उध्वस्त झालेली कुटुंबे हा प्राधान्याचा विषय वाटत नाही, ही हेरंब कुलकर्णी यांची पोस्ट कोरोनाची दाहकता सांगत आहे. 

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com