साईबाबांच्या शिर्डीतही कोरोनाचा शिरकाव 

शिर्डीतही कोरोनाचा एक रुग्ण आढळून आल्याने शहर पुढील 14 दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. शेजारच्या गावात कंटेनमेंट क्षेत्र जाहीर झाल्याने आणि शिर्डीतही रुग्ण आढळल्याने प्रशासन व ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.
 Corona patient found in Shirdi
Corona patient found in Shirdi

शिर्डी  : देशभरातील धार्मिक स्थळे आठ जूनपासून खुली करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असली तरी शिर्डीतील साईबाबांचे मंदिर राज्य सरकारच्या निर्णयानुसार 30 जूनपर्यंत बंदच ठेवले जाणार आहे.

या शिवाय शिर्डीतही कोरोनाचा एक रुग्ण आढळून आल्याने शहर पुढील 14 दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. शेजारच्या गावात कंटेनमेंट क्षेत्र जाहीर झाल्याने आणि शिर्डीतही रुग्ण आढळल्याने प्रशासन व ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे. 

शिर्डी शेजारील निमगावमध्ये पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे तेथे 12 जूनपर्यंत कंटेनमेंट झोन जाहीर करून गाव सील करण्यात आले आहे. दरम्यान, या गावातील एक बाधित महिला शिर्डीतील तिच्या माहेरी मुक्कामी होती. त्यामुळे शिर्डीतील एका महिलेलाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संबंधितांची बैठक घेतली. पुढील धोका टाळण्यासाठी चौदा दिवस शिर्डीतील व्यवहार पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. 

दरम्यान, शिर्डीतील अत्यावश्‍यक सेवा सुरू राहणार आहे. शिर्डी नगर पंचायतीचे कर्मचारी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करणार आहेत. शिर्डी व परिसरात करोनाची लागण होऊ नये; म्हणून सुरुवातीपासून दक्षता घेण्यात येत होती. मात्र शिर्डीतही अखेर कोरोनाच्यी विषाणूने शिरकाव केला आहे. 

साई संस्थानचा कर्मचारी निघाला कोरोनाबाधित 

नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून रविवारी दिवसभरात दहा नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. यात राहाता तालुक्‍यातील ममदापूर येथील 35 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. संबंधित बाधित तरुण शिर्डीला साईबाबा संस्थानमध्ये सेवेत आहे. निमगाव येथील भाजी विक्रेता बाधित महिलेच्या मुलाचा तो मित्र आहे. दोघेही सोबत काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. 

राहाता तालुका कोरोनामुक्त झाल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र, मागील चार ते पाच दिवसांत तालुक्‍यातील निमगाव येथील भाजी विक्रेता महिला कोरोनाबाधित आढळून आल्याने प्रशासनाची झोप उडाली होती. प्रशासनाने खबरदारी म्हणून निमगाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करत चौदा दिवस संपूर्ण गाव बंद केले. 

संबंधित महिलेच्या संपर्कातील जवळपास 45 व्यक्तींची तपासणी करत त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. यातील पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी एक आणि आज पुन्हा एक असे रुग्ण आढळून आले आहेत. आता नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 141 झाली असून तालुक्‍यात शिर्डीत एक, निमगावमधे सहा आणि आता ममदापूर येथे एक असे एकुण आठ रुग्ण आहेत. 

जिल्ह्यात 10 कोरोनाबाधितांची भर 

आज कोरोनाबाधित निष्पन्न झालेला व्यक्ती हा साईबाबा संस्थानमधे कार्यरत असल्याने खबरदारी म्हणून संस्थान प्रशासनला अधिक काळजी घेणे महत्वाचे आहे. मंदिर बंद असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना सुटी आहे. अशा हे कर्मचारी कोठे गेले, कोणत्या नातेवाइकांकडे जाऊन आले, कोणत्या मित्रांच्या सोबत होते, याची तपासणी करणे महत्वाचे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com