शिवसेना व भाजपची परस्पर विरोधी आंदोलने

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नुकत्यात झालेल्या अटकेच्या निषेधार्थ भाजपच्या येथील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शहरातील गांधी चौक परिसरात आज (बुधवारी) निदर्शने केली.
शिवसेना व भाजपची परस्पर विरोधी आंदोलने
Sarkarnama.jpg

श्रीरामपूर ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नुकत्यात झालेल्या अटकेच्या निषेधार्थ भाजपच्या येथील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शहरातील गांधी चौक परिसरात आज (बुधवारी) निदर्शने केली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या.

आंदोलनकांनी निदर्शने करुन नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ यांना भाजपतर्फे निवेदन दिले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या येथील पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करुन निषेध व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर झालेली कारवाई ही तालिबानी प्रकारची असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून संजय राऊत यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी असंसदीय भाषेचा वापर केला. मात्र त्यांच्यावर अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नसल्याचा आरोप भाजपच्या येथील पदाधिकाऱ्यांनी केला.

हेही वाचा...

नारायण राणे यांना जेवण करताना अटक केली. ही कारवाई भारतीय संस्कृतीला धरून केलेली नसून राज्य सरकार सत्तेचा दुरूउपयोग करीत असल्याचा सवाल भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, भाजपाचे शहराध्यक्ष मारूती बिंगले, तालुकाध्यक्ष बबन मुठे, अभिजित कुलकर्णी, गणेश मुदगुले, शशिकांत कडूस्कर, राजेंद्र कांबळे, गणेश राठी, सतिश सौदागर, रामभाऊ तरस, अनिल भनगडे, सुप्रिया धुमाळ, अनिता शर्मा, माधुरी ढवळे, भटक्या विमुक्त आघाडीचे विठ्ठल राऊत, सांस्कृतिक आघाडीचे बंडुकुमार शिंदे, विशाल यादव, अक्षय वर्पे, रूपेश हरकल, अक्षय नागरे यांनी केला.

राणेंच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केल्यानंतर येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील गांधी पुतळ्यासमोर येवून केंद्रीय मंत्री राणे यांच्या वक्तव्याचा काल (मंगळवारी) सायंकाळी तीव्र निषेध केला. यावेळी शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या विरोधात घोषणा देवून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. राणे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली कीड असल्याचे  शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडदे यांनी स्पष्ट केले. दिल्लीत जाऊन काही लोक तुकडे घेऊन महाराष्ट्रात येतात. त्यानंतर महाराष्ट्रात गरळ ओकतात. त्यात राणे यांचा समावेश आहे.

हेही वाचा...

शिवसेनेवर टीका करणे हा नारायण राणे यांचा एकमेव कार्यक्रम असल्याचा आरोप बडधे यांनी केला. याबाबत निषेध व्यक्त करुन  सहायक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांना शिवसैनिकांनी निवेदन दिले. तसेच राणे यांच्या वक्तव्यामुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली.

त्यावर सहायक पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरु असून एकत्रित तपास सुरु आहे. नाशिकचे पोलिस महासंचालक यांनी राणे यांना अटक करण्याच्या सुचना दिल्या असून निवेदनाची दखल घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सचिन बडदे, अरुण पाटील, अशोक थोरे, यासिन सय्यद, निखिल पवार, महेश कुलकर्णी, रामा अग्रवाल, आशिष शिंदे, विकास भांड, किशोर फाजगे उपस्थित होते

Edited By - Amit Awari

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in