लंकेंच्या सेल्फीमुळे चित्रा वाघ गरजल्या, म्हणाल्या...

आमदार लंके यांनी फडणवीस यांच्या समवेत सेल्फी काढला. हा सेल्फी कमालीचा व्हायरल झाला. पारनेरमध्ये तर भाजपने दोन पावले माघार घेतल्याची चर्चा रंगली.
chitra wagh 3.jpg
chitra wagh 3.jpg

अहमदनगर ः पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. या क्लिपमध्ये देवरे यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्यावर भाष्य केले. त्यामुळे भाजपला मुद्दा मिळाला आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लंकेंवर टीकास्त्र सोडले होते. चित्रा वाघ यांनी पारनेरला जाऊन देवरे यांची भेट घेतली. अहमदनगरचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांचीही भेट घेतली होती. 

या पार्श्वभूमीवर काल आमदार लंके यांची नागपूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यावेळी आमदार लंके यांनी फडणवीस यांच्या समवेत सेल्फी काढला. हा सेल्फी कमालीचा व्हायरल झाला. पारनेरमध्ये तर भाजपने दोन पावले माघार घेतल्याची चर्चा रंगली. तशा पोस्टही सोशल मीडियावर फिरू लागल्या. काही वृत्तपत्रांच्या ई आवृत्तीत तर भाजपने दोन पावले माघारीचे वृत्तही प्रसिद्ध करण्यात आले. यावर काल (बुधवारी) चित्रा वाघ यांनी ट्विट करत आमदार लंके यांना सुनावले आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की "कमाल आहे... आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी सोबत फोटो काढून लगेच भाजपची दोन पावले माघारची बातमी छापून आणलीत... ओ... लंके ते आमचे नेते देवेंद्रजी आहेत. दोन पावले माघार घेतं नाही तर 200 पावले पुढे जात ठोकणारे... हे ध्यानात ठेवा. ज्योतीताई देवरेंच्या मागे आम्ही सगळे सक्षमतेने उभे..."

देवरें विरोधातील आंदोलन सुरूच
तहसीलदार देवरे यांची पारनेर मधून बदली करा अथवा आम्हा सर्वांची बदली करा. या मागणीसाठी पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचारी व तलाठी कालपासून तहसील कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करत आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. देवरे यांनी नायब तहसीलदारांच्या मदतीने महसूलचे काम सुरळीत ठेवण्यात येईल, असे सांगितले आहे. तहसीलदार देवरे या महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या कार्याध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे हा संघर्ष अधिकारी संघटना विरोधात कर्मचारी संघटना असा सुरू झाला आहे. देवरे यांनी कर्मचारी राजकीय दबावाखाली आंदोलन करत असल्याचा आरोप केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com