राणेंसाठी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर

सत्तेचा गैरवापर करुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अपमानास्पद वागणूक देत केलेली अटक बेकायदेशिर असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
राणेंसाठी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर
bjp andolan.jpg

संगमनेर ः इतरांना शिवराळ भाषेत बोलणारे सत्ताधारी पक्षातील नेते व कार्यकर्ते तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्वतःवर झालेली टीका देखील खुल्या दिलाने स्विकारु शकत नाही. सत्तेचा गैरवापर करुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अपमानास्पद वागणूक देत केलेली अटक बेकायदेशिर असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. काल संगमनेरात शिवसेनेने केलेल्या आंदोलनानंतर आज भाजपानेही या प्रकरणी उडी घेतली आहे.


निवेदनात म्हटले आहे, की राजकीय टीका टिपण्णी सहन न करणारे सत्ताधारी स्वतः मात्र थोबाडीत देण्याची भाषा करतात. मुस्काडीत मारण्याची भाषा केल्यानंतर त्यास उत्तर म्हणुन तसे केल्यास थोबाडीत दिली जाईल या राजकीय प्रश्नोत्तरातही, सत्ताधारी सोनिया सेनेच्या नेत्यांनी सत्तेचा गैरवापर करुन व पोलिस यंत्रणा खासगी नोकर असल्यासारखी वापरुन गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकारे सत्ताधाऱ्यांकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर दुर्दैवी आहे. तसेच स्वतःचा वापर करुन देणारे पोलीसही शासनाच्या सेवेत राहण्याच्या लायकीचे नाहीत.

नारायण राणे यांना पोलिसांनी दिलेल्या अपमानास्पद वागणूकीचा तसेच राज्यातील महाआघाडी सरकारचा भारतीय जनता पक्षाच्यावतीने तीव्र निषेध करीत आहोत. संगमनेर शहरातही समाज माध्यमे अगर अन्य ठिकाणी केलेल्या राजकीय टिका टिप्पणीवरुनही स्थानिक सोनिया सेनेचे कार्यकर्ते हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पोलीसांकडे दबाव आणण्यासाठी बोलावून दमदाटी करीत असल्याचा अनुभव गेल्या सहा महिन्यात येत आहे. असा पोलिसांनाही समज देण्यात यावी. असे गैरप्रकार बंद न झाल्यास भाजपाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

निवेदनावर अँड. श्रीराम गणपुले, विकास गुळवे, मेघा भगत, रोहिदास साबळे, संजय वाकचौरे, विठ्ठल शिंदे, वैभव लांडगे, शुभम बेल्हेकर, दीपेश ताटकर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in