भाजप कार्यकर्ते म्हणाले, नारायण राणे अंगार है...

केंद्रीय मंत्री राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष अकोले तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
भाजप कार्यकर्ते म्हणाले, नारायण राणे अंगार है...
akole andolan bjp.jpg

अकोले ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना जाणीवपूर्वक आकस बुद्धीने राज्यातील ठाकरे सरकारने कायद्याचा दुरुपयोग करुन असंवैधानिक पद्धतीने अटक केली. ही तालिबानी राजवट आहे का असा सवाल भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केला आहे. महाभकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, नारायण राणे अंगार है, बाकी सब भंगार है, उद्धव सरकार हाय हाय अश्या घोषणा देत सरकारचा निषेध केला. यावेळी प्रभारी तहसीलदार महाले यांनी निवेदन स्वीकारले.

केंद्रीय मंत्री राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष अकोले तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी भांगरे बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदचे गटनेते जालिंदर वाकचौरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, सरचिटणीस यशवंत अभाळे, सोशल मीडिया सेलचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख, अॅड. भाऊसाहेब गोडसे, अॅड. दीपक शेटे, ओबीसी आघाडी अध्यक्ष किशोर काळे, प्रसन्न धोंगडे, शिवाजी उंबरे, ज्ञानेश पुंडे, ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पारासूर, युवा सरचिटणीस सुशांत वाकचौरे, मनोज वावळे, सौरभ देशमुख, गोकुळ वाघ आदी उपस्थित होते.

हेही वाचा...

भांगरे यांनी सांगितले की, अतिशय साधे कलम असणाऱ्या गुन्ह्यासाठी ऐवढा गाजावाजा करीत राणे यांच्या अटकेची घाई केली. तेवढी तत्परता या सरकारने जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या मारहाण प्रकरण असो वा राठोड यांचे वरील मुलीच्या आत्महत्या घटना असो, शर्जील उस्मानी मोकाट हिंडत आहे. राज्य सरकार पालघरच्या साधू हत्याकांड प्रकरणात गप्प बसले आहे मात्र राणे यांच्या विरोधात लगेच कार्यवाही केली. एवढी तत्परता राज्य कारभार करताना कोरोना मुक्तीसाठी आरोग्य सुविधा उपलब्धतासाठी दाखवली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. जिल्हा परिषद सदस्य गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. 

भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी यांनी राज्यात दररोज महिलांवर अत्याचार होत असताना हे सरकार डोळे झाकून काम करते. मुख्यमंत्री त्यांच्या भाषणात झापड मारतो असे बोलतात तेव्हा त्यांचेवर काय कारवाई करणार, असा सवाल केला. युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख यांनी सूडबुद्धीने कारवाई करणाऱ्या सरकारचा निषेध करत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.
 

Edited By Amit Awari

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in