धक्कादायक : महिला सरपंचाला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण! 

गुंडशाहीचा धुडगूस थांबवावा.
धक्कादायक : महिला सरपंचाला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण! 
BJP workers beat up female sarpanch .jpg

नगर : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) ग्रामपंचायत सदस्यांच्या गुंडांनी आपल्याला लाथ मारून अपमान केल्याचा गंभीर आरोप एका महिला सरपंचाने केला आहे. यासंदर्भात एक व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये या महिला सरपंच त्यांना ग्रामसभेत आलेल्या अनुभवा विषयी सांगत आहेत. तसेच, पोलिसांकडून देखील अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप या सरपंचांनी केला आहे. (BJP workers beat up female sarpanch)  

या संदर्भात रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की ''उक्कडगावच्या एका महिला सरपंचाला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण आणि अत्यंत खालच्या पातळीच्या शिव्या दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. मी स्वतः नगर पोलिस आयुक्तांशी बोलले आहे. आरोपींवर कडक कारवाई व्हावी आणि या गुंडशाहीचा धुडगूस थांबवावा'' असे चाकणकर यांनी म्हटले आहे. 

नगरमधील उक्कडगावमध्ये राणी काथोरे या सरपंच आहेत. बुधवार (ता. ८ सप्टेंबर) त्यांनी तंटामुक्ती अध्यक्ष निवडताना ग्रामपंचायचीमध्ये गोंधळ झाला. त्यातून विरोधी पक्षाच्या लोकांनी गुंडांकरवी आपल्याला त्रास दिल्याचा आरोप काथोरे यांनी केला आहे. ग्रामसभा चालू असताना मी तंटामुक्तीचा अध्यक्ष निवडला. समोरच्या पार्टीला तो मान्य नव्हता. त्यावरुन त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे मी सभा तहकूब करून त्यांना अर्ध्या तासाचा वेळ दिला. बहुमताने आपण अध्यक्ष निवडू, असे सांगितले. मात्र, तेही त्यांना मान्य झाले नाही. त्यानंतर त्यांनी गोंधळ घातला. अशी माहिती राणी काथोरे यांनी व्हिडीओमध्ये दिली आहे.

ग्रामसभेमध्ये गोंधळ झाल्यानंतर जेव्हा राणी कथोरे कार्यालयाकडे निघाल्या, तेव्हा भाजपच्या गुंडांनी मागून लाथ मारल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिवीगाळ केली. लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारची वर्तणूक केली. मला सोडवायला येणाऱ्या लोकांनाही मारहाण केली. मी पोलिस स्टेशनला गेले. पण तिथे माझी दखल घेतली नाही. मला २ ते ४ तास बसवून ठेवले गेले. त्यांच्यावर कुणाचा दबाव असेल, तर तेही त्यांनी सांगावे. मला न्याय मिळावा आणि त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी काथोरे यांनी केली आहे. 
 Edited By - Amol Jaybhaye

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in