'राज्यातील जनतेला जे अपेक्षित आहे ते भाजप देईल'

भाजप युवा मोर्चा व ओबीसी सेलच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
Ram shinde.jpg
Ram shinde.jpg

कर्जत : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची महाविकास आघाडीची सत्ता आहे. ही सत्ता स्थापन झाल्यापासून भाजप नेत्यांकडून हे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाही असे वक्तव्य करण्यात येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळेल असे भाकीत केले आहे. 'BJP will give what is expected to the people of the state'

भाजप युवा मोर्चा व ओबीसी सेलच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उदघाटन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

हेही वाचा...

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास  पिसाळ,प्रथम  नगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, ज्येष्ठ नेते शांतीलाल कोपनर व काकासाहेब धांडे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव लष्कर ,शहराध्यक्ष वैभव शहा, उपसरपंच गणेश काळदाते, पप्पू धोदाड, गणेश पालवे, प्रकाश  शिंदे, , बापू शेळके दादासाहेब सोनमाळी, सुनील यादव,  नगरसेविका उषा राऊत, राणी गदादे, नीता कचरे, डॉ कांचन खेत्रे, आशा वाघ , मंदा होले यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी, महिला पदाधिकारी, उपस्थित होते.

या वेळी माजी मंत्री प्रा राम शिंदे यांची सर्वप्रथम रक्तदान केले तसेच माझा रक्तगट ओ पॉझिटिव्ह असून तो सर्व गटातील रुग्णांना चालतो. नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी रक्तदानाचा हक्क बजावला हे मी माझे भाग्य समजतो, या मुळे गरजवंताला प्राणदान मिळेल, असे माजीमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा...


प्रा. राम शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सेवा आणि समर्पण दिवशी समाजातील गरजू,उपेक्षित आणि वंचित घटकांना सेवा द्यावी.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील उत्कृष्ट नेतृत्व असून त्यांचा जन्मदिन सेवाकार्य व समर्पण दिन म्हणून देशात, राज्यात साजरा केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जो इशारा दिला आहे त्या प्रमाणेच घडण्याची शक्यता आहे.आघाडी सरकार हे अकार्यक्षम सरकार असून ते आल्यापासून कधी कोसळेल याचा भरवसा नाही. काहीतरी गडबड आहे. राज्यातील जनतेला जे अपेक्षित आहे ते भाजप देईल, असा टोलाही राम शिंदे यांनी लगावला.

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com