एटीएम फोडणाराच तयार करत होता बनावट नोटा : पारनेर पोलिसांच्या तपासात झाले समोर 

वडगाव सावताळ(ता.पारनेर) येथे बनावट नोटा छापण्याच्या कारखान्याचा पारनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
एटीएम फोडणाराच तयार करत होता बनावट नोटा : पारनेर पोलिसांच्या तपासात झाले समोर 
parner police.jpg

टाकळी ढोकेश्वर : राज्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र पारनेर तालुक्यातील एटीएम फोडण्याच्या घटनेतील आरोपी पोलिसांनी जेरबंद केला अनं नवीनच प्रकार पोलिसांच्या समोर आला.

वडगाव सावताळ(ता.पारनेर) येथे बनावट नोटा छापण्याच्या कारखान्याचा पारनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी विकास सुरेश रोकडे (वय 19) (रा. वडगाव सावताळ) या तरुणास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून नोटा छापणारे मशीन, कटींग मशिन, पाचशे, शंभरच्या बनावट नोटा, खराब झालेल्या, चुरगळलेली नोटा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा...

या प्रकरणी पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिलेल्या माहितीनुसार टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँकेचे एटीएम 26 ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पिकप च्या मदतीने चोरून नेण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपींचा छडा लावून विकास रोकडे यास अटक केली होती.

विकास रोकडे याची कसून चौकशी केली असता त्याची त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या घराची, आजीच्या घराची झडती घेण्यात आली, त्यावेळी शेतामधील आजीच्या घरात दडवून ठेवलेले रंगीत झेरॉक्स मशीन, कागदाची रिम, कटिंग मशीन, 100 व पाचशेच्या बनावट नोटा, चुरगळलेल्या, खराब झालेल्या बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा...

आरोपी विकासकडे कसून चौकशी केली असता आपण बनावट नोटा तयार करीत असल्याची कबुली त्याने दिली आहे. या बनावट नोटा त्याने कुठे वितरित केल्या, या रॅकेटमध्ये अजून कोण आरोपी आहेत ? याचा पारनेर पोलीस शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली. पथकामध्ये पोलीस अंमलदार भालचंद्र दिवटे, सुधीर खाडे, सुरज कदम, सत्यजित शिंदे, श्रीनाथ गवळी, सचिन लोळगे, पोलीस मित्र अभिजीत जाधव यांचा समावेश आहे. 

बनावट नोटांच्या आधारे नागरिकांची फसवणूक झाली असेल, किंवा बनावट चलनी नोटांच्या संदर्भात आणखी काही अपराध केले असतील तर पारनेर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक घनश्याम बाळप यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in