bjp.jpg
bjp.jpg

मंदिरे उघडण्याच्या आंदोलनात अण्णा हजारेही आमच्या बरोबर - महेंद्र गंधे

अहमदनगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपती मंदिरा समोरही भाजपने शंख व घंटानाद आंदोलन केले.

अहमदनगर ः कोरोनाचे कारण देत राज्य सरकारने राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. सध्या हिंदू व जैन धर्मीयांसाठी पवित्र समजला जाणारा चातुर्मास सुरू आहे. यात मंदिरे बंद असल्याने भाजपने राज्यभर राज्य सरकार विरोधात आज शंखनाद आंदोलन सुरू केले आहे. अहमदनगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपती मंदिरा समोरही भाजपने शंख व घंटानाद आंदोलन केले.

अहमदनगरमधील विशाल गणपती मंदिर हे ऐतिहासिक आहे. या मंदिरासमोर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन झाले. या आंदोलनात भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. अभय आगरकर, वसंत लोढा, माजी नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी, सुवेंद्र गांधी, सुनील रामदासी, महेश तवले, तुषार पोटे, किशोर बोरा, उमेश साठे, सिद्धेश नाकाडे, अभिषेक वऱ्हाडे, मल्हार गंधे, ऋग्वेद गंधे, अंजली वल्लाकट्टी, प्रिया जाणवे, वसंत राठोड, किशोर कटारे, महेश नामदे, पंकज जहागीरदार, संजय ढोणे आदी सहभागी होते.

हेही वाचा...

महेंद्र गंधे म्हणाले, राज्यातील तिघाडी सरकारच्या त्रासाला कंटाळून मंदिर, गुरूद्वारा उघडावेत यासाठी भाजप आज शंखानाद आंदोलन करत आहे. महाराष्ट्रात दारूचे बार राज्य सरकारने उघडले आहेत. मात्र कोरोना काळात नागरिकांना मानसिक स्वास्थ मिळेल अशी मंदिरे उघडण्याची ठाकरे सरकारची इच्छा नाही. आजचे आंदोलन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रभर करण्यात आले. येणाऱ्या काळात लवकरात लवकर ठाकरे सरकारने मंदिरे उघडली नाहीत तर अत्यंत तीव्र आंदोलन भाजपकडून करण्यात येईल. या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हेही आमच्या बरोबर आहेत, असे गंधे यांनी सांगितले.

अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, मंदिरे आपली प्रेरणा आणि शक्तीस्थाने आहेत. देवादिकांच्या आशिर्वादाने आपले जीवन सुख व सुमृद्ध होत असते. ही प्रेरणास्थाने बंद ठेवून सरकार भाविकांना एकप्रकारे वेठीस धरत आहेत. मंदिरातून कोरोना होतो व इतर ठिकाणाहून होत नाही का? राज्य सरकारचा हा निर्णय तुघलकी कारभार असून, त्यामुळे भावनांबरोबर मंदिरावर अवलंबून असणार्‍या अनेक घटकांवर हा अन्याय आहे. मंदिर उघडण्याचा निर्णय घेईपर्यंत आंदोलने केली जातील, असे सांगितले.

हेही वाचा...

वसंत लोढा म्हणाले, सर्वत्र जीवनमान सुरु झाल्याने आता मंदिरे उघडण्यास काही हरकत नसतांना राज्य सरकार फक्त वेळकाढू पणा करत आहे. देवदर्शनाने सर्वांची दु:खे नाहिसे होतात, सात्विक विचार मिळतात, ती मंदिरे बंद ठेवून सरकारला काय सध्या करायचे, हेच कळत नाहीये. याबाबत आम्ही वेळोवेळी आंदोलने करत असून, या आंदोलनास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दिला आहे, असे सांगून हे आंदोलन यापुढेही सुरु राहील, असे सांगितले.

यावेळी गंधे यांनी हातात आरतीचे तबक घेऊन मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उभे राहत गणपतीची आरती केली. आरतीनंतर राज्य सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com