अहमदनगर जिल्हा प्रशासनाने दिला नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे रात्री जेऊरमधील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यात नागरिकांची मोठी आर्थिक हाणी झाली.
shevgoan.jpg
shevgoan.jpg

अहमदनगर ः अहमदनगर शहर व जिल्ह्यात आज जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्व ओढे, नाले व नद्या दुधडी भरून वाहत आहेत. नगर तालुका व शेवगाव तालुक्याला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. हवामान विभागाने तीन दिवस पावसाचा इशारा दिला होता. त्यातील पहिले दोन दिवस पाऊस झाला नाही. मात्र काल रात्रीपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या शिवाय हवामान विभागाने चार सप्टेबरपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे रात्री जेऊरमधील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यात नागरिकांची मोठी आर्थिक हाणी झाली. शेवगावमध्ये काही जनावरे वाहून गेली. सुमारे 40 कुटुंबांना वाचविण्यासाठी महसूल प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाला मोहीम हाती घ्यावी लागली. त्यामुळे अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी प्रसिद्धीपत्रक काढून सतर्कतेचा इशारा दिला आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त सूचनेनुसार आज (ता. 31) व उद्या (ता. 1) या कालावधीत अहमदनगर जिल्हयामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. आजपर्यंत अहमदनगर जिल्हयात 375.08 मिलीमीटर म्हणजेच सरासरीच्या 83.79 टक्के पर्जन्यमान झालेले आहे.

हेही वाचा...

स्थानिक प्रशासनाव्दारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावेत. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. तसेच पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. 

नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर इण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट अथवा मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्याऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. 

हेही वाचा...

घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उदभवू शकतो. 

सेल्फी नको
धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच अहमदनगर जिल्हा नियंत्रण कक्ष येथील दुरध्वनी क्र.1077 (टोल फ्री) 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा, असे आवाहन नागरिकांना प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com