त्यानंतरच राज्यातील यात्रा अनं जत्रा ः मंत्री अमित देशमुख - After that Yatra and Jatra in the state: Minister Amit Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

त्यानंतरच राज्यातील यात्रा अनं जत्रा ः मंत्री अमित देशमुख

आनंद गायकवाड
गुरुवार, 26 ऑगस्ट 2021

कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घालण्यात आली आहे.

संगमनेर ः कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घालण्यात आली आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तविण्यात येत असला तरी, राज्यातील लोककलावंतांना कोविड काळात आर्थिक सहाय्य व तमाशा फडाना मदत करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. हळूहळू राज्यातील यात्रा आणि जत्रांना परवानगी देणार असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला दिली.

राज्यातील ढोलकीवरील लहान मोठे सुमारे 130 तमाशा फड कोविडमुळे ठप्प असल्याने, यावर उपजिवीका असलेले ग्रामीण भागातील लोककलावंत उपासमार सहन करीत आहेत. आज उद्या करता करता दीड वर्ष उलटले तरी, त्यांच्या फडावरची ढोलकी कडाडली नाही.

चरितार्थासाठी या कलावंतांना रोजंदारीची कामे करावी लागली. दसऱ्यापासून तमाशा कलावंतांचा सुरू झालेला हंगाम पावसाळ्याच्या सुरवातीपर्यंत चालतो. कोविड प्रादुर्भावामुळे राज्यातील यात्रा, जत्रा बंद असल्याने तमाशा कलेवर अवकळा आली आहे. या पार्श्वभुमिवर आज मुंबईच्या मंत्रालयात अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. 

हेही वाचा...

देवरे व लंकेंनी वाद वाढवू नये

राज्यातील पूर्णवेळ तमाशा फड आणि हंगामी तमाशा फडांना प्रतिवर्षी शासनाकडून अनुदान मिळावे, तमाशा फडांना एक तासांचा अधिक वेळ वाढवून मिळावा, गाव यात्रा चालू करुन तमाशा फडांच्या कार्यक्रमांना परवानगी मिळावी अशा काही मागण्यांचे निवेदन यावेळी मंत्री देशमुख यांना देण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या उपाध्यक्षा मंगला बनसोडे, सचिव शेषराव गोपाळ, उपसचिव मोहित नारायणगावकर, खजिनदार किरण ढवळपुरीकर, संचालक राजेश सांगवीकर, अविष्कार मुळे, मुसा इनामदार आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख