आदिती तटकरे यांनी नीलेश लंकेंच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप, म्हणाल्या...

आमदार लंके म्हणाले, मतदारसंघातील कामांसाठी राज्यमंत्री तटकरे निश्चित निधी देतील या भागात टोमॅटो पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याकरीता कोल्डस्टोरेजसाठी निधी द्यावा.
आदिती तटकरे यांनी नीलेश लंकेंच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप, म्हणाल्या...
tatakare.jpg

टाकळी ढोकेश्वर ः खडकवाडी येथे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या सात कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचे भुमिपूजन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके होते. तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, अशोक सावंत, सुदाम पवार, अशोक घुले, अ‍ॅड राहुल झावरे, बापू शिर्के, जितेश सरडे, पुनम मुंगसे उपस्थित होते.

राज्य मंत्री तटकरे म्हणाल्या, कोरोना काळात आमदार निलेश लंके यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे आम्ही सर्व ते सातत्याने पाहत होतो कार्यकर्त्यांचा व आपल्या लोकांचा सन्मान करणारे हे नेतृत्व आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी आमदार निलेश लंके यांची असणारी जवळीक पारनेरकरांच्या फायद्याशी ठरत असुन मतदारसंघासाठी विविध स्तरांमधून मोठा निधी उपलब्ध होत आहे असे मत राज्याच्या क्रीडा व पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा...

दोन वर्षांपासून कोरोना काळात शासनस्तरावर निधी उपलब्ध होण्यास खुप अडचणी आल्या. मात्र आगामी काळात पारनेर तालुक्यातील क्रीडा व पर्यटन विकास कामांसाठी आमदार नीलेश लंके यांनी निधी उपलब्ध करून घेतला. आमदार लंके यांची मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी करीता कायम तळमळ असते. महाविकास आघाडीत मंत्री व आमदार यांना दोघांनाही सारखा न्याय दिला जातो, असे तटकरे यांनी सांगितले.

हेही वाचा...

आमदार लंके म्हणाले, मतदारसंघातील कामांसाठी राज्यमंत्री तटकरे निश्चित निधी देतील या भागात टोमॅटो पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याकरीता कोल्डस्टोरेजसाठी निधी द्यावा. जो काम करतो त्याच्यावर टीका होत राहते त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायचे असते. आपण केलेले काम लोकांसमोर आहे. कोरोना काळात कोविड सेंटरच्या माध्यमातून मोठ्या संख्येत नागरिकांना आधार दिला ही समाधानाची बाब आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in