आदिती तटकरे या 'बाप से बेटी सवाई' निघतील - अण्णा हजारे

तटकरे म्हणाल्या, ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी सामाजिक जीवनात एक आदर्श निर्माण केला आहे . त्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करताना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे व प्रेरणादायी आहे.
आदिती तटकरे या 'बाप से बेटी सवाई' निघतील - अण्णा हजारे
anna hajare.jpg

राळेगणसिद्धी : क्रीडा व उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, माजी सरपंच जयसिंग मापारी, शरद मापारी, दत्ता आवारी, शाम पठाडे, संदीप पठारे, अन्सार शेख, सतीश भालेकर, सदाशिव पठारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाल्या, ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी सामाजिक जीवनात एक आदर्श निर्माण केला आहे . त्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करताना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे व प्रेरणादायी आहे. हजारे यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. राळेगणसिद्धीचा विकासाची माहितीही जाणून त्यांनी घेतली. सार्वजनिक जीवनात अण्णांचे काम आणि योगदान खूप मोठे आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हाच्या दौऱ्यावर येतानाच अण्णांना भेटायचे ठरवले होते. त्यांचा आमच्या कुटुंबीयांशी स्नेह आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीने नवीन ऊर्जा मिळाली.सार्वजनिक क्षेत्रातील अण्णांचे काम तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहे, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी राळेगणसिद्धीला आल्याचे त्या म्हणाल्या.

हेही वाचा...

शुद्ध आचार, विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग आणि अपमान सहन करण्याची शक्ती ही पाच तत्त्वे आपल्या जीवनात बाळगल्यास समाजपरिवर्तन आणि देशाचा विकास करू शकतो असा सल्ला अण्णा हजारे यांनी राज्यमंत्री तटकरे यांना दिला.
यावेळी अण्णांनी माजी मंत्री तथा सध्याचे खासदार सुनील तटकरे यांच्याशीही दूरध्वनी वरून संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

अण्णा हजारे म्हणाले, की खासदार सुनील तटकरे आणि माझे जुने संबंध आहेत. मी अनेकदा त्यांच्या विरोधात रायगडमध्ये जाऊन आंदोलन केली होती. मात्र राज्यमंत्री आदिती तटकरे या कमी वयात घेत असलेला राजकीय अनुभव पाहता भविष्यात त्या 'बाप से बेटी सवाई' निघतील. यात मला शंका वाटत नाही, असे हजारे यांनी सांगितले.

देवरे-लंके आले एकमेकांसमोर
तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार नीलेश लंके व तहसीलदार देवरे आज पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले. मात्र दोघेही आपल्या प्रोटोकॉलमुळे आले असल्याने दोघांचे एकमेकांशी बोलणे मात्र सोयीस्कर टाळले. 
 

Edited By - Amit awari

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in