'पुण्यातील बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल'

या प्रकरणातील तपासावरपुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे लक्ष असून त्यांनी पोलिसांना तपासात गती देण्याच्या सूचना केल्या आहेत.
'पुण्यातील बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल'
Ajit pawar.jpg

मुंबई : पुणे रेल्वे स्थानक परिसरातून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून आठ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आठही आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या प्रकरणी पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील तपासावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे लक्ष असून त्यांनी पोलिसांना तपासात गती देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर त्यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितले की, पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक असून या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींना अटक करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. 

हेही वाचा...

सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची संपूर्ण काळजी राज्य शासन घेईल. पुणे पोलिसांनी गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपासाची व आरोपींच्या अटकेची कारवाई केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांना अधिक दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुन्ह्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षात घेता रेल्वे राज्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांनाही अशा प्रवृत्ती रोखण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

याबाबत 14 वर्षीय पीडित मुलीने तक्रार दिली आहे. पीडित मुलगी ही तिच्या मित्राला भेटण्यासाठी मुंबईला चालली होती. ती मूळची बिहारची असून तिचे वडील वानवडी येथील एका व्यक्तीच्या घरी माळी काम करतात. ती तिच्या आई-वडिलांसोबत राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 31 ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीत घडला आहे. 

पीडित मुलगी 31 ऑगस्ट रोजी गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात आली होती. मात्र, आता कोणतीही गाडी नाही, तू गावी कशी जाणार, असे म्हणत आम्ही तुझी राहण्याची व्यवस्था करतो, असे आरोपींनी सांगून तिला बाहेर आणले. रिक्षातून तिला वानवडी परिसरात नेले. त्या ठिकाणी आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. तसेच, दुसऱ्या दिवशी देखील तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

एकूण सात ते आठ आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार काल उघडकीस आला आहे. त्यानंतर वानवडी पोलिसांनी तात्काळ या आरोपींचा शोध घेत त्यांना अटक देखील केली आहे. आरोपींमध्ये काही रिक्षा चालक आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in