Work Assessment will be done MSEDCL Orders Energy Minister Nitin Raut | Sarkarnama

महावितरणमधील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामाची होणार बारकाईने छाननी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 जून 2020

उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरण कंपनीमध्ये तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आता पुढे काय होणार अशी चर्चा महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सुरु झाली आहे. ही प्रक्रिया कशी असेल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर : महावितरण कंपनीमध्ये असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांचे फेरमुल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या फेरमुल्यांकनानुसार ही पदे आवश्यक आहेत काय, याबाबत आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल. 

उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरण कंपनीमध्ये तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आता पुढे काय होणार अशी चर्चा महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सुरु झाली आहे. ही प्रक्रिया कशी असेल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अनेक जागाही रिक्त

महावितरणच्या ऊर्जा विभागामध्ये तांत्रिक अधिकारी मोठ्या प्रमाणावर आहेत. नियमानुसार महावितरणची क्षमतावाढ त्यांच्याकडून अपेक्षित आहे. मात्र, याच विभागात असलेल्या उणीवांबाबत अनेकदा तक्रारी येतात. महावितरणच्या कार्यप्रणालीत त्रुटी आहेत, असाच याचा अर्थ होतो. या विभागात अनेक जागाही रिक्त आहेत. त्या जागा पदोन्नतीने भरणे अपेक्षित आहे. मात्र अनेकदा मागील दाराने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच नेमले जाते. त्यामुळे तरुणांच्या रोजगाराच्या संधींवरही पाणी फिरते हे अनेकदा दिसले आहे. 

कंपनीच्या माहिती व तंत्रज्ञान शाखेत सुमारे ५५०  पदे आहेत. तरी सुद्धा फारसे भरीव काम झाल्याचे दिसून येत नाही. वीज ग्राहक आणि कंपनी यांच्यात सुसूत्रताही निर्माण झालेली नाही. त्यामुळे या शाखेकडे लक्ष देऊन तिच्या कामकाजात सुधारणा करणे व शाखा अद्यायावत करणे आवश्यक असल्याचा मुद्दाही डाॅ. राऊत यांनी घेतलेल्या बैठकीत उपस्थित झाला. कंपनीच्या वित्त विभागातही अनेक पदे असून ती भरली गेलेली नाहीत. त्यामुळे हा विभागही आपल्या पूर्ण क्षमतेने काम करु शकत नाही. महावितरण कंपनीच्या जनसंपर्क विभागाने ग्राहकांना माहिती देण्याबरोबरच तक्रार निवारणाच्या कामात लक्ष देणे व मदत करणे अपेक्षित आहे.

एकूणच महावितरणच्या सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम, त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यांचे फेरमुल्यांकन होणे गरजेचे आहे. आता त्यावर काम करुन अहवाल सादर करावा, असे आदेश उर्जामंत्री नितीन राऊत यांनी कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाला दिले आहेत.

या व्यतिरिक्त महावितरणच्या जनसंपर्क विभागाने माहिती बरोबरच तक्रार निवारणाच्या कामात सहाय्य करणे आवश्‍यक आहे. या दृष्टीने सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामांचे, त्यांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचे फेरमुल्यांकन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महावितरणमधील तांत्रिक विभाग, माहिती-तंत्रज्ञान विभाग व वित्त विभागाच्या कामकाजाबद्दल तक्रारी आहेत. त्यांच्या बाबत उर्जामंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या विभागांबाबत काय केले जाणार याबाबतही उत्सुकता आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख