सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडासह 'ही' शिक्षा होणार  

कोरोनासारख्या महामारीचा संसर्ग हा थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे आढळले आहे. थुंकल्यामुळे मोठ्या प्रमाणात आजार होऊ शकतात.
Rajesh Tope Sakal Times1
Rajesh Tope Sakal Times1

पुणे  : सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत फेसबुक लाईव्हद्वारे कोरोना प्रतिबंधासाठी घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यासाठी संवाद साधला. थुंकल्यास व धुम्रपान केल्याप्रकरणी असलेला दंड आणि शिक्षा अधिक कठोर करण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली. 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' मानला जातो, शिक्षेपेक्षा संस्कारीत व्हा, कुठल्याही परिस्थितीत थुंकू नका, धुम्रपान करू नका, असे टोपे यांनी सांगितले.
 

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे अनेक संसर्गजन्य व प्राणघात आजाराचा फैलाव होतो. कोरोनासारख्या महामारीचा संसर्ग हा थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे आढळले आहे. थुंकल्यामुळे मोठ्या प्रमाणात आजार होऊ शकतात. अनेक आजार हे थुंकीतून पसरतात. कोवीड आणि धुम्रपान या दोन्हीसाठी एकत्रित्त निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहे. एकदा थुंकला तर हजार रूपये दंड, दुसऱ्यांदा थुंकल्यास तीन हजार रूपये तर तिसऱ्यांदा थुंकल्यास पाच हजार रूपये व दंड तसेच सहा महिन्यांची शिक्षा, अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे कोरोना प्रतिबंधासाठी घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती  दिली.  
 
राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सार्वजनिक ठिकाणी पानमसाला, गुटखा तंबाखू, सुपारी, पान, तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे टोपे यांनी सांगितले. खासगी रूग्णालयाबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. 30 जुलैपर्यंत परवाना नुतनीकरण करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. यामाध्यमातून रूग्णालयांना आता परवाना आणि नुतनीकरण 30 जुलैपर्यंत करता येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. 

ही बातमीपण वाचा : मोदींचे देशवासीयांना पत्र  
 
नवी दिल्ली : कोरोनाच्या लढ्यात 130 कोटी भारतीयांनी आपल्या एकजुटीने जगाला अचंबित केले आहे. त्याचप्रमाणे आर्थिक क्षेत्रातही आपण नवे उदाहरण स्थापित करू. भारतीय नागरीक आपल्या सामर्थ्याने आर्थिक क्षेत्रातही जगाला चकितच नव्हे तर प्रेरितही करू शकतात, असा दुर्दम्य विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.सलग दुसऱ्या वेळेस स्पष्ट आणि घवघवीत बहुमताने विजयी झालेल्या नरेंद्र मोदी सरकारला आज (ता. 30) एक वर्ष पूर्ण होत आहे. देशाता कोरना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना एक पत्र लिहून वर्षपूर्तीनिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वर्षभरातील घटनांवर त्यांनी भाष्य केले आहे. त्यांनी स्वतःला प्रधानसेवक असे संबोधित केले आहे. स्थानिक उत्पादनांच्या बळावर जन्माला येणाऱ्या आत्मनिर्भर भारतात प्रत्येक देशवासियासाठी, शेतकरी,  कामगार, लघु उद्योजक, स्टार्ट अपशी जोडलेले युवा उद्योजक या सर्वांसाठी हे  नवे अभियान नव्या संधी घेऊन येईल, असेही मोदींनी म्हटले. आपल्या संदेशाच्या अखेरीस त्यांनी आरोग्यसंपन्न राहा, सुरक्षित राहा, जागृत राहा, जागरूकता ठेवा, असेही आवाहन  देशवासीयांना केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com