दहावी भुगोलाच्या विषयाला मिळणार इतर विषयांच्या सरासरीइतके गुण

दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो. त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर होतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्व पातळ्यावर अडचणी आहेत. निकाल कधी लागेल तसेच नवे शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याबाबतही अनिश्‍चितता आहे
Tenth Standard Geography Students to get Aggrigate Marks
Tenth Standard Geography Students to get Aggrigate Marks

पुणे : दहावीच्या भूगोल विषयाला इतर विषयांच्या लेखी परीक्षेतील गुणांच्या सरासरीइतके गुण देऊन या विषयात विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणात येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे या विषयाची परीक्षा घेता आली नव्हती. परीक्षा रद्द झाल्यानंतर गुण देण्याबाबत फार्म्युला ठरविण्यात येईल, असे राज्य माध्यामिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार या विषयाची गुणदान पद्धती मंडळाचे ठरविली आहे, असे मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले.

'सरकारनामा'शी बोलताना काळे म्हणाल्या, ''भूगोल विषयाबाबत मंडळाने नियमानुसार योग्य निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीचा भूगोलाचा पेपर मंडळाने रद्द केला होता. पेपर तपासणीलादेखील लॉकडाऊनमुळे अनेक अडचणी येत आहेत. मात्र, एकही दिवस वाय न घालवता काम सुरू आहे.'' दहावी व बारावीचा निकालाबाबत त्यांनी निश्‍चितपणे सांगण्यास नकार दिला. आमच्या पातळीवर काम सुरू आहे. मात्र, निकाल कोणत्या महिन्यात जाहीर करण्यात येईल याबाबत आताच सांगता येणार नसल्याचे डॉ. काळे यांनी स्पष्ट केले.

दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो. त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर होतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्व पातळ्यावर अडचणी आहेत. निकाल कधी लागेल तसेच नवे शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याबाबतही अनिश्‍चितता आहे. दहावी-बारावीचा निकाल जाहीर होण्यास यावर्षी जुलै-ऑगस्ट उजाडला तर पुरवणी परीक्षा कधी होणार हा देखील प्रश्‍न आहे. 

पुरवणी परिक्षेबाबत साशंकता

रवर्षी जूनमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर तातडीने जुलैच्या शेवटी पुरवणी परीक्षा घेतल्या जातात. तातडीने निकाल जाहीर करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ३० सप्टेबरपूर्वी अकरावीत प्रवेश दिला जातो. त्यामुळे बऱ्याच मुलांचे शैक्षणिक वर्ष वाचण्यास मदत होते. मात्र, यावर्षी मूळ निकाल जाहीर होण्यासच जुलै-ऑगस्ट उजाडण्याची शक्यता असल्याने पुरवणी परीक्षा होणार का? या बाबत साशंकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com