नवा कोरोना उद्योगनगरीत आला का? इंग्लडहून आलेल्याला कोरोनाची लागण - PCMC Administration worried about New Corona Virus | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

नवा कोरोना उद्योगनगरीत आला का? इंग्लडहून आलेल्याला कोरोनाची लागण

उत्तम कुटे
रविवार, 27 डिसेंबर 2020

मिळून न आलेल्या तीसपैकी कुणाला विषाणूच्या जणुकीय रचनेत बदल झालेल्या नव्या कोरोनाची लागण झाली असेल, तर हा रोग पुन्हा शहरात वेगाने पुन्हा पसरण्याची भीती प्रशासनाला सतावू लागली आहे. युरोपात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेगाने पसरणारा कोरोना नव्या रुपात आला आहे. त्यामुळे तेथून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान आलेल्यांचा शोध घेण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे.

पिंपरी : वेगाने प्रसार होणाऱ्या नव्या कोरोना विषाणूचा इंग्लडहून आलेला एक रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये मिळून आल्याने पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. मात्र, इंग्लडहून नुकत्याच परतलेल्या १४ जणांचे कोरोना चाचणी तपासणीचे अहवाल येणे बाकी असल्याने तसेच इंग्लडहून शहरात आलेल्या तीसजणांचा मागच न लागल्याने पालिका प्रशासन हादरून गेले आहे.

मिळून न आलेल्या तीसपैकी कुणाला विषाणूच्या जणुकीय रचनेत बदल झालेल्या नव्या कोरोनाची लागण झाली असेल, तर हा रोग पुन्हा शहरात वेगाने पुन्हा पसरण्याची भीती प्रशासनाला सतावू लागली आहे. युरोपात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेगाने पसरणारा कोरोना नव्या रुपात आला आहे. त्यामुळे तेथून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान आलेल्यांचा शोध घेण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. 

त्यानुसार पिंपरी पालिकेने शहरातील आपल्या आठ दवाखान्यांतील डॉक्टर व त्यांचे मोबाईल नंबर संपर्कासाठी प्रसिद्ध केले आहेत. त्यावर शहरातील खासगी डॉक्टर व रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या व इंग्लंडहून आलेल्या रुग्णांबाबत माहिती देण्याचे आवाहन परवा केले आहे. त्यानुसार पालिकेकडे गेल्या दोन दिवसांत अशा ११५ जणांची नावे आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली. 

त्यातील ८५ जणांची कोरोना चाचणी केली असता त्यातील ३५ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझीटिव्ह आला. त्याच्यावर भोसरी येथील पालिकेच्या नव्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ७० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले  आहेत. इंग्लडहून आलेले १५ जण शहराबाहेर गेले आहेत. तर, १५ जणांचा शोध त्यांच्या अपूर्ण पत्यामुळे न लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत पडले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख