ठाणे जिल्हा मनोरुग्णालयात नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची कोविड टेस्टच नाही

जवळपास सर्वच लोकांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीपोटी इतर आजारावरील रुग्णांची तपासणी करण्यास कोणी डॉक्‍टर धजावत नाहीत, असे काही ठिकाणी दिसते. तरीही ठाणे जिल्हा मनोरुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या मनोरुग्णांना केवळ कुटुंबातील सदस्यांच्या लेखी हमीवर कोविड टेस्ट न करताच दाखल करून घेण्यात येते.
No Covid test done at Thane Mental Hospital
No Covid test done at Thane Mental Hospital

ठाणे : राज्यात सर्वत्र कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोना व्यतिरिक्त इतर आजारावर उपचार करण्याआधी कोविड चाचणी केल्यानंतरच त्या रुग्णांना तपासले जाते. मात्र, ठाणे जिल्हा मनोरुग्णालय प्रशासनाकडून केवळ घरच्यांनी दिलेल्या माहितीवर विसंबून मनोरुग्णांना मनोरुग्णांना दाखल करून घेण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

कोरोनाच्या कालावधीत दाखल करून घेतलेल्या रुग्णांचे विलगीकरण केले जाते. पण त्यांच्यासाठी स्वतंत्र स्टाफ उपलब्ध नाही. कोणतेही सुरक्षेच्या साधनाशिवाय येथील विलगीकरणातील रुग्णांसह इतर रुग्णांवर कर्मचाऱ्यांना उपचार करावे लागत आहे. त्यामुळे त्यामुळे मनोरुग्णालयात देखील कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्‍यता भीती सतत व्यक्त केली जात आहे. 

केवळ नातेवाईकांच्या हमीपत्रावर दिला जातो प्रवेश

जवळपास सर्वच लोकांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीपोटी इतर आजारावरील रुग्णांची तपासणी करण्यास कोणी डॉक्‍टर धजावत नाहीत, असे काही ठिकाणी दिसते. तरीही ठाणे जिल्हा मनोरुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या मनोरुग्णांना केवळ कुटुंबातील सदस्यांच्या लेखी हमीवर कोविड टेस्ट न करताच दाखल करून घेण्यात येते. त्यांना दाखल करुन घेतल्यानंतर त्यांना विलागीकरण केंद्रात ठेवण्यात येते. मात्र, विलिगीगरणात ठेवलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र स्टाफ नाही. 

त्यामुळे विलगीकरण कक्षातील रुग्णांवर उपचार करणारे कर्मचारीच नियमित कक्षातील रुग्णांची देखभाल व त्यांच्यावर उपचार करतात. या कर्मचाऱ्यांना केवळ हातातील ग्लोव्हज् देण्यात आले आहेत. सुरक्षेची अन्य कोणतीच साधने त्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे एखाद्या नव्याने दाखल झालेल्या रुग्णास कोरोनाची लागण झालेली असल्यास इतर रुग्णांना देखील त्याची लागण होऊ शकते ही वस्तुस्थिती आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा मनोरुग्णालयात अती आवश्‍यक असलेल्या मनोरुग्णांनाच दाखल करून घेण्याचे आदेश आहेत. तसेच मानसोपचार तज्ञांकडून मनोरुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच त्यांना दाखल करून घेण्यात येते. त्यांची कोविड तपासणी होत नाही. मात्र, त्यांच्या घरच्यांकडून रुग्णाला सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे नसल्याचे हमीपत्र आम्ही घेतो," असे ठाणे जिल्हा मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मकरंद पाटील यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com