दिलासादायक बातमी ; राज्यातील भूजल पातळीत सुधारणा, मात्र, या जिल्ह्यात पाणी टंचाई 

भौगोलिक स्थिती आणि अपुरा पाऊस यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
ground water level
ground water level

पुणे : कोरोनाच्या संकटात एक दिलासादायक बातमी म्हणजे यंदा राज्यात भूजल पातळीत सुधारणा होत आहे. त्यामुळे अनेक गावांमधील पाण्याचे संकट दूर झाले आहे. राज्यात मागील ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे खोलवर गेलेल्या भूजल पातळीत पुन्हा सुधारणा झाली आहे. पण, भौगोलिक स्थिती आणि अपुरा पाऊस यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम भूजल सर्वेक्षण यंत्रणेद्वारे राज्यात मार्च महिन्यातील भूजल पातळीच्या सर्वेक्षणावरही झाला आहे.सप्टेंबर 2019 अखेर राज्यातील 353 पैकी 213 तालुक्यांमध्ये सरासरीएवढा पाऊस झाला. 142 तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत घट आढळली. परंतु ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील 353 पैकी 252 तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली.

या पावसामुळे एक मीटरपेक्षा जास्त भूजल पातळी खोल गेलेल्या गावांची संख्या 9 हजार 355 वरुन 5 हजार 475 इतकी कमी झाली. तीन मीटरपेक्षा जास्त भूजल पातळी खोल गेलेल्या गावांमध्ये टंचाईची तीव्रता सर्वाधिक असते. अशा गावांची संख्या सप्टेंबरअखेर 4 हजार 164 आढळली होती. ती जानेवारीमध्ये 1 हजार 726 इतकी कमी झालेली आहे. ऑक्टोबरअखेर संभाव्य पाणीटंचाई अहवालामध्ये 359 गावांमध्ये यावर्षी जानेवारीनंतर टंचाईची शक्यता वर्तविण्यात आली होती. ती जानेवारीअखेर 317 गावांपुरती मर्यादित आढळली. सिंचनासाठी झालेला भूजल उपशामुळे भूजल पातळीत झालेल्या बदलाचा अभ्यास करण्यात आला.

जानेवारीअखेर 32 हजार 769 निरीक्षण विहीरींमधील भूजल पातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. त्यानुसार राज्यातील भूजल पातळी स्थिती (गावांची संख्या आणि घट) :
5 हजार 475 गावे - एक मीटरपेक्षा जास्त घट
2 हजार 514 - 1 ते 2 मीटर घट
1 हजार 235 - 2 ते 3 मीटर घट
1 हजार 726 - तीन मीटरपेक्षा जास्त घट

टंचाईग्रस्त जिल्हा-तालुके 

लातूर जिल्हा : लातूर, चाकूर, देवणी, उदगीर
उस्मानाबाद : भूम, परंडा
परभणी : जिंतूर
सोलापूर : पंढरपूर
चंद्रपूर : राजुरा
अमरावती : भातकुली
यवतमाळ : यवतमाळ, घाटंजी, कळंब, केळापूर, राळेगाव.
 


ऑक्टोबर महिन्यातील पावसाने झालेल्या जलपुनर्भरणामुळे भूजल पातळीत वाढ झाली. परिणामी संभाव्य पाणीटंचाई भासणाऱ्या गावांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे 'चला करूया, पावसाच्या पाण्याचे संकलन, संवर्धनासह भूजल पुनर्भरण' याची प्रत्येकाने अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
डॉ. मिलिंद देशपांडे, सहसंचालक, भूजल सर्वेक्षण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com