कोकण रेल्वे - दादर-सावंतवाडी २६ पासून ट्रॅकवर - Konkan Railway To Start Schedule from Coming Week | Politics Marathi News - Sarkarnama

कोकण रेल्वे - दादर-सावंतवाडी २६ पासून ट्रॅकवर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

कोकण रेल्वे मार्गावर २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्‍टोबर या दरम्यान दादर ते सावंतवाडी ही तुतारी एक्‍सप्रेस पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार आहे. दादर स्थानकातून रात्री १२.०५ मिनिटांनी सुटलेली ही गाडी सावंतवाडी स्थानकात दुपारी १२.२० वाजता पोचणार आहे. तर परतीची सावंतवाडी-दादर ही गाडी सावंतवाडी येथून सायंकाळी ५.३० वाजता सुटेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता पोचणार आहे.

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर दादर ते सावंतवाडीपर्यंत जाणारी तुतारी एक्‍सप्रेस २६ सप्टेंबरपासून पुन्हा धावणार आहे. ही गाडी ३१ ऑक्‍टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार तर १ नोव्हेंबर पासून नियमित वेळापत्रकानुसार धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.

कोरोना प्रादुभार्वाच्या पार्श्‍वभूमीवर २१ मार्चपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मे आणि जून महिन्यात परप्रांतियांसाठी विशेष श्रमिक गाड्या सोडण्यात आल्या. त्यानंतर गणेशोत्सवासाठी मुंबई ते सावंतवाडी या दरम्यान स्पेशल एक्‍सप्रेस गाड्या चालविण्यात आल्या होत्या. याखेरीज मंगला आणि नेत्रावती या दोन लांब पल्ल्याच्या एक्‍सप्रेस गाड्याही सुरू ठेवण्यात आल्या होत्या.

कोकण रेल्वे मार्गावर २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्‍टोबर या दरम्यान दादर ते सावंतवाडी ही तुतारी एक्‍सप्रेस पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार आहे. दादर स्थानकातून रात्री १२.०५ मिनिटांनी सुटलेली ही गाडी सावंतवाडी स्थानकात दुपारी १२.२० वाजता पोचणार आहे. तर परतीची सावंतवाडी-दादर ही गाडी सावंतवाडी येथून सायंकाळी ५.३० वाजता सुटेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता पोचणार आहे.

कोकण रेल्वेचे नॉन मान्सून वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. यात १ नोव्हेंबरपासून तुतारी एक्‍सप्रेस दादर येथून मध्यरात्री १२.०५ वाजता सुटेल आणि सावंतवाडीत सकाळी १०.४० वाजता पोचेल. तर परतीची सावंतवाडी-दादर ही गाडी सावंतवाडी स्थानकातून सायंकाळी ७.१० वाजता सुटेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता पोचणार आहे. ही गाडी सिंधुदुर्गात वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकात थांबणार आहे. एकूण १९ डब्यांच्या या गाडीची रचना २ टियर एसी २ कोच, ३ टियर एसी ४ कोच, स्लिपर ८ कोच, सेकंड सिटिंग ४ कोच आणि एसएलआर २ कोच अशी आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख