महाराष्ट्राने लसीचे ५६ टक्के डोस वापरलेच नाहीत - जावडेकरांचा आरोप

महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या ५४ लाख कोरोना प्रतिबंधक लशीच्या डोसांपैकी केवळ २३ लाख डोस १२ मार्चपर्यंत वापरले आहेत. ५६ टक्के डोस न वापरताच पडून आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय पर्यावरण तसेचमाहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
Prkash Javadekar Comment about Covid Vaccine Use in Maharashtra
Prkash Javadekar Comment about Covid Vaccine Use in Maharashtra

नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या ५४ लाख कोरोना प्रतिबंधक लशीच्या डोसांपैकी केवळ २३ लाख डोस १२ मार्चपर्यंत  वापरले आहेत. ५६ टक्के डोस न वापरताच पडून आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय पर्यावरण तसेच माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. (Half of Corona Vaccine Doses sent to Maharahtra Unused Claims Prakash Javadekar)

राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असून दुसऱ्या लाटेला (Corona Second Wave) सुरवात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात वेगाने वाढत असलेल्या कोरोनाबाबत केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले, असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदारांनी कोरोना लशीचे (Covid Vaccine) अतिरिक्त डोस राज्याला द्यावेत, अशी मागणी केली आहे. राज्याचे (Maharashtra) आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही केंद्राकडे अतिरिक्त लशीची मागणी केली आहे. 

त्या पार्श्वभूमीवर प्रकाश जावडेकर यांनी राज्यावर टीका केली आहे. ५६ टक्के लशीचे डोस वापराविना असल्याचे सांगतानाच आधी कोरोना महामारीच्या काळातली अव्यवस्था, आणि आता लसीकरणाचे अयोग्य व्यवस्थापन...असे म्हणूत जावडेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.  (Half of Corona Vaccine Doses sent to Maharahtra Unused Claims Prakash Javadekar)

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून कोरोना रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मजबूत करण्याचा सल्ला दिला आहे. हाँटस्पाँट, कंटेन्मेंट झोनमध्ये प्रशासकीय यंत्रणा अधिक मजबूत करा, असे राजेश भूषण यांनी राज्य सरकारला सूचविले आहे. कोरोनाग्रस्त रूग्ण, कोरोनाची चाचणी आणि क्वारंटाइन सेंटर आदीबाबत प्रशासनाने अधिक लक्ष देणे गरजेच आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. कोरोनाची लागण झालेल्या प्रत्येक रूग्णांच्या संपर्कात आलेल्या २० ते ३० जणांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करा, असेही त्यांनी सूचविले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com