सोलापूर : कोरोनाच्या विरोधात सर्वशक्तीनिशी लढून सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी गेल्या दहा महिन्यापासून शर्थीचे प्रयत्न करणा ऱ्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.
ते सध्या सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सर्व सोलापूर जिल्हावासियांनी मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करून कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करावे, स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी., असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.
21 तारखेला उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह आले. ते प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून घरी उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या कोवॅक्सिन लशीचा पहिला डोस या महिन्याच्या सुरुवातीला घेतलेला होता. संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी व काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
हे देखिल पहा -
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना या नव्या लाटेने राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे. यातच आता महाराष्ट्राच्या मंत्रालयातही कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. मंत्रालयातील विविध विभागांतील तब्बल ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. यामुळे मंत्रालय प्रशासन हादरले आहे.
देशात 1.47 लाख कोरोना बाधीत रुग्ण आहेत. यातील एक तृतीयांश अर्थात बावन्न हजार 956 रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. अर्थात सर्वाधीक 19.94 लाख कोरोनामुक्त रुग्ण देखील याच राज्यात आहेत. त्यामुळे आजच्या घडीला महाराष्ट्र ही कोरोनाची राजधानी होऊ पहात आहे. त्यामुळे राज्य सरकार लवकर जागृत झाल्याने आगामी काळात नागरिकांचा प्रतिसाद कळीचा मुद्दा ठरणार आहे. गतवर्षी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळल्यापासून आत्तापर्यंत देशात एक कोटी दहा लाख 556 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. यातील एक कोटी 6 लाख 97 हजार 393 रुग्ण आजपर्यंत बरे झाले आहेत.
Edited By - Amit Golwalkar

