निर्णयाबददल तुझ्या पप्पाला विचार ? 

ग्रामपंचायतचा निधी शासनाला देणार नाही अशी भूमिका जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षांनी घेतली
  निर्णयाबददल तुझ्या पप्पाला विचार ? 

कोल्हापूर : जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ग्रामपंचायतींकडे असणाऱ्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याज शासनास देण्यावरुन मंगळवारी जिल्हा परिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष बजरंग पाटील व सदस्य राहुल आवाडे यांच्यात खडाजंगी झाली. 

हा निधी परत पाठवायचा नाही, या श्री. आवाडे यांच्या वक्‍तव्यावर , या निर्णयाबददल अगोदर तुझ्या पप्पाला विचार, अशी सुचना अध्यक्ष .पाटील यांनी आवाडे यांना केल्याने सभागृहात जोरदार गदारोळ झाला. माझे वडील आमदार आहेत. ते विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांच्याबाबत केलेले चुकीचे वक्‍तव्य खपवून घेणार नाही, असेआवाडे यांनी सांगितले. 

तरीही अध्यक्ष पाटील यांनी मात्र आपल्या वक्‍तव्यावर माघार घेतली नाही. 

ग्रामपंचायतचा निधी शासनाला देणार नाही अशी भूमिका जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षांनी घेतली .सदस्य राहुल आवाडे ,विजय भोजे, राजवर्धन निंबाळकर, शिवाजी मोरे , शंकर पाटील यांनी या निर्णयास विरोध केला. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा या निर्णयाला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी याबाबत जी.आर. असल्याचे सांगितले. 

यावर शासन निर्णय व परिपत्रक, यातील फरक समजून घ्या, असा टोला श्री. आवाडे यांनी लगावला. 

आवाडे व सतीश पाटील यांच्यात खडाजंगी सुरू असतानाच यात अध्यक्ष बजरंग पाटील यांनी उडी घेतली. अध्यक्ष पाटील यांनी श्री. आवाडे यांना एकेरी बोलवत तुझ्या पप्पाला विचार, असे विधान केले. यामुळे संतापलेल्या आवाडे यांनी अध्यक्ष पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. 

माझे वडील हे आमदार आहेत. त्यांच्याविषयी चुकीचे वक्‍तव्य खपवून घेणार नाही. मी माझ्या वडिलांना विचारून आलो आहे. तुम्हाला यावर बोलण्याचा अधिकार नाही, असे सांगतच श्री पाटील यांना धारेवर धरले. यावेळी सताधरी व विरोधी सदस्यांनी आपापल्या सदस्यांची बाजू घेतली. सदस्य विजय भोजे व मनोज फराकटे यांनी श्री.आवाडे यांचा समजुत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रोसेडिंगमधून ही चर्चा काढून टाकण्याचा निर्णय झाल्यानंतर यावर पडदा पडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com