...मग आरएसएसच्या कार्यकर्त्यांना नागपूरमध्येही पाठवा : राजू शेट्टी 

धारावीत काम करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एखाद्या कार्यकर्त्यांचा कोरोनामुळे बळी गेल्याचे किंवा त्या काळात जीव धोक्‍यात घालून कार्यकर्ते काम केल्याचे कुठेही वाचनात आलेले नाही. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेकडून धारावीतील कोरोना परिस्थिती चांगली हाताळल्याचे सांगताच श्रेय घेण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत.
... then send RSS workers to Nagpur too: Raju Shetty :
... then send RSS workers to Nagpur too: Raju Shetty :

कोल्हापूर : धारावीत काम करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एखाद्या कार्यकर्त्यांचा कोरोनामुळे बळी गेल्याचे किंवा त्या काळात जीव धोक्‍यात घालून कार्यकर्ते काम केल्याचे कुठेही वाचनात आलेले नाही. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेकडून धारावीतील कोरोना परिस्थिती चांगली हाताळल्याचे सांगताच श्रेय घेण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (ता. 13 जुलै) केली. 

कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने वीज दरवाढ तसेच वीजबिल माफ करावे, या मागणीसाठीचे निवदेन देण्यात आले. या वेळी शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. 

आरएसएसचे मुख्य कार्यालय असणाऱ्या नागपूरमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. इचलकरंजीसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे संकट उभे आहे. मुंबई धारावीमध्ये कोरोना वाढल्यामुळे लोक किडा-मुंगीप्रमाणे मरत होते. त्यावेळी मदत आणि बचाव कार्यामध्ये आरएसएसचे कार्यकर्ते जीव धोक्‍यात घालून काम करत आहेत. काही कार्यकर्त्यांचा बळी गेला आहे, असे कुठेही वाचनात आले नाही. मात्र, जागतिक आरोग्य संस्थेने सांगितले की धारावीची परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली गेली आहे. त्यानंतर मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धारावीत आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतल्याचे सांगून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

आरएसएसचे मुख्य कार्यालय असणाऱ्या नागपूरमध्येही कोरोना विषाणूचा हाहाकार सुरू आहे. तिथे संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही, हे माहिती मला नाही. मात्र, तेथील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी आरएसएसच्या कार्यकर्त्यांना नागपूरमध्ये पाठवा, असा टोला राजू शेट्टी यांनी भाजपला लगावला. 

भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. हे मी चार वर्षांपासून सातत्याने सांगतो आहे. सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्‍स विभाग एका राजकीय पक्षासारखे काम करत आहेत. एखाद्या राजकीय पक्षाची सत्ता कायम कशी राहिल, यासाठी हे प्रयत्न करत आहेत. भाजपला गैरसोयीचे असणारे लोक बाजूला केले जात आहेत. या विभागाकडून वेगवेगळ्या चौकशा लावल्या जात आहेत. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

राजस्थान, मध्य प्रदेशमधील सरकार बदलले, कर्नाटकमध्ये अस्थितरता निर्माण केली. हीन प्रकारचे राजकारण ते करत आहेत. या पूर्वी भाजपपेक्षाही ताकदवान पक्षाची सत्ता होती. पण, सत्तेचा कधीही गैरवापर केला गेला नाही. भाजपची नीती लोकशाहीवर प्रेम असणाऱ्यांना संताप आणणारी आहे. लोकशाहीवर निष्टा असणाऱ्यांनी एकत्र आले पाहिजे आणि हेच शरद पवार बोलले आहेत. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com