...तर देवेंद्र फडणवीस यांचे डोळे पांढरे होतील : मुश्रीफांचा टोला 

धारावी झोपडपट्टीत बुधवारी (ता. 8 जुलै) केवळ एक रुग्ण सापडला आहे. लस उपलब्ध झाली नाहीतरी ऑगस्टपर्यंत मुंबईतील कोरोना संपून जाईल, असा विश्‍वास मुंबईच्या आयुक्‍तांनी व्यक्‍त केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वेळात वेळ काढून मुंबईला भेट देवून ही व्यवस्था पाहवी. हे पाहिल्यानंतर निश्‍चितच त्यांचे सुद्धा डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत.
 ... then Devendra Fadnavis's eyes will be white : Mushrif
... then Devendra Fadnavis's eyes will be white : Mushrif

कोल्हापूर : कोरोनाच्या संकटाचा सामना राज्य सरकार मोठ्या हिंमतीने करत आहे. टेस्टिंग लॅबची संख्या 2 वरून 125 वर गेली आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी अद्ययावत व्यवस्था मुंबईत करण्यात आली आहे. कोरोनाचा अनुभव नवीन असतानाही राज्य सरकार चांगली कामगिरी करत आहे. 

धारावी झोपडपट्टीत बुधवारी (ता. 8 जुलै) केवळ एक रुग्ण सापडला आहे. लस उपलब्ध झाली नाहीतरी ऑगस्टपर्यंत मुंबईतील कोरोना संपून जाईल, असा विश्‍वास मुंबईच्या आयुक्‍तांनी व्यक्‍त केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वेळात वेळ काढून मुंबईला भेट देवून ही व्यवस्था पाहवी. हे पाहिल्यानंतर निश्‍चितच त्यांचे सुद्धा डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोला मुश्रीफ यांनी लावला. 

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी दिल्याबददल मुश्रीफ यांचा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. या वेळी बोलताना मुश्रीफ यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडतानाच ग्रामविकास विभागाच्या कामाचा आढावा घेतला. 

मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अभ्यासू आहेत. कोरोनाच्या परिस्थितीवर ते लक्ष ठेवून आहेत. कोरोनासाठी कोणती औषधे घ्यायची, त्याचा काय परिणाम होईल याची माहिती ते न पाहता सांगतात. कोरोनाचा पुर्वानुभव नसतानाही राज्य सरकार चांगले काम करत आहे. तरीही विरोधकांकडून टीका सुरु असते. मी पुन्हा येईन....मी पुन्हा येईन आणि पांडुरंगाचे दर्शन घेईन, असेही वक्‍तव्य करण्यात आले. मात्र, पांडुरंगाने ते काही होऊ दिले नाही, असा टोला मुश्रीफ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. तसेच, फडणवीस यांनी वेळात वेळ काढून एकदा मुंबईत राज्य सरकारने कोरोनाचे जे काम केले आहे त्याची पाहणी करावी, असा सल्लाही या वेळी दिला. 

एकही आठवडा चुकला नाही 

राज्यात सत्ता बदलल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच कोरोनाचे सावट आले. या संकटाचा सामना करण्यासाठी जोरात प्रयत्न सुरु आहेत. एवढे मोठे संकट येऊनही मी दर आठवड्याला मुंबईत जातो. अधिकाऱ्यांना आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज राज्यातील जनतेच्या हितासाठी काय निर्णय घेता येतील, त्यासाठी माझे सतत प्रयत्न सुरु आहेत. मंत्रिपद मिळाल्यापासून व मोठे संकट येऊनही मुंबईची वारी चुकली नसल्याचे सांगतानाच सहा महिन्यांत घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांचा माहिती मुश्रीफ यांनी दिली. 
 

हे होणार निर्णय 

►ग्रामीण भागात पुनर्निमाण प्रकल्प 
►महिला बालसमिती लाभार्थी उत्पन्न अट सुधारणा 
►ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक पदांची भरती 
►शिक्षक बदलीबाबत येणार सरकारी निर्णय 
►स्वामित्व योजना येणार 
►ग्रामपंचायत बांधकाम परवान्याबाबत निर्णय 

Edited By : Vijay Dudhale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com