उदयनराजेंच्या जलमंदिरात चांदीच्या बंदुकीची चोरी; चोरटा तत्काळ गजाआड - Theft Attempt in Udyanaraje Residence | Politics Marathi News - Sarkarnama

उदयनराजेंच्या जलमंदिरात चांदीच्या बंदुकीची चोरी; चोरटा तत्काळ गजाआड

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानातून एकाने तब्बल २ किलो वजनाची शोभेची चांदीची बंदूक चोरी केली. या घटनेची माहिती सातारा शहर पोलिस ठाण्यातील पोलिसाला मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेत चांदीची बंदूक जप्त करण्यात आली आहे

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानातून एकाने तब्बल २ किलो वजनाची शोभेची चांदीची बंदूक चोरी केली. या घटनेची माहिती सातारा शहर पोलिस ठाण्यातील पोलिसाला मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेत चांदीची बंदूक जप्त करण्यात आली आहे. 

याबाबात अद्याप पोलिसांकडून तपास सुरु आहे.याबाबत प्राथमिक माहिती अशी की, सोमवारी दुपारी एकजण चांदीची बंदूक विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सातारा शहर पोलिस ठाण्याचा कर्मचारी भुसुंगे यांना मिळाली. त्यानुसार ते जुना मोटार स्टँड परिसरात गस्त घालत असताना संशयित निदर्शनास आला. याची माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्यातील डीबी पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करून संशयिताला ताब्यात घेतले व शोभेची बंदूक जप्त केली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख